अनेक समाजपयोगी उपक्रमांची करण्यात आली घोषणा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – राष्ट्रीय अंधत्वनिवारण योजने अंतर्गत कार्यरत असलेले नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठे एकमेव चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व नंदीग्राम लॉयन्स ट्रस्ट नांदेड संचलित लायन्स नेत्र रुग्णालयाचा १४ वा वर्धापन दिन दि.७ मे रोजी जंगमवाडी येथील नेत्र रुग्णालयात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री डि.पी.सावंत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पद्मश्री तथा माजी राज्यसभा सदस्य नागपूर येथील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.विकास महात्मे,शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर,डॉ. वर्धमान कांकरीया,डॉ.कुलदिप डोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक भावनेतून उच्च दर्ज्याची नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया या सुविधा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पुरवण्याचे ध्येय बाळगुन समर्पित रुग्णसेवेच्या १४ वर्षाची यशस्वी वाटचाल करत लॉयन्स नेत्र रुग्णालयाने आपली १४ वर्षे अविरत सेवा देतानाा १ लाख नेत्र शस्त्रक्रिया करण्याबरोबरच १४ लाखांपेक्षा जास्त नेत्र रुग्णांची तपासणी केली असून आजरोजी शहरातील कै.संग्राम पोमदे रुग्णालय,वर्कशॉप कॉर्नर, जंगमवाडी,नांदेड. शाखा : डॉ. आंबेडकर चौक ते सिडको रोड, सिडको, नवीन नांदेड अशा दोन ठिकाणी लायन्स नेत्र रुग्णालय चालविण्यात येते आहे.
१४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध उपक्रमांची घोषणा
लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित सोहळ्यात लॉयन्स टिमने जास्तीत नेत्र रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया करण्याबरोबरच नेवरवाडी ता.हदगांव हे गाव दत्तक घेतले तर डौर ता.अर्धापूर येथील सरस्वती प्रा.शा.ही आश्रमशाळा नेत्र तपासणीसाठी दत्तक घेतली तसेच अनेक उपक्रमांची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे.
वर्धापन दिन सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नंदिग्राम लॉयन्स ट्रस्ट संचालक मंडळ चे अध्यक्ष लॉ.राजेश लोटीया संयोजक तथा उपाध्यक्ष लॉ.गंगाप्रसाद तोष्णीवाल,सचिव लॉ.अॅड. प्रविण अग्रवाल,कोषाध्यक्ष लॉ. अरुणकुमार तोष्णीवाल, सहसचिव व सहसंयोजक लॉ. शिरीष कासलीवाल यांच्यासह लॉ.नारायणलाल कलंत्री .लॉ. जयेश ठक्कर लॉ.दिलीप मोदी लॉ.ज्ञानेश्वर महाजन लॉ. नित्यानंद मैच्या,लॉ.संजय सारडा,लॉ.अनिलकुमार तोष्णीवाल,लॉ.सुनिल भारतीया,लॉ.धनंजय डोईफोडे लॉ.रवि कासलीवाल लॉ.रवि कडगे लॉ.विश्वजीत राठोड लॉ.डॉ.लक्ष्मीकांत बजाज लॉ.अशोक कासलीवाल लॉ.प्रदीप सोनपेठकर लॉ.मनिष माकन लॉ. ज्योती जांगीड,लॉ. अनिलकुमार तोष्णीवाल लॉ. सचिन मानधनी लॉ.प्रफुल्ल अग्रवाल आदींनी परिश्रम घेतले