श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी
माहूर – महाराष्ट्र राज्यासह माहूर किनवट तालुक्यातील गोरगरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या नागरिकांना हातभार देण्याचा वारसा लाभलेले मंत्रालयीन सनदी अधिकारी प्रशांत भाऊ राठोड यांचे सह त्यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानकडून माहूर किनवट तालुक्यातील असहाय, गोरगरीब नागरिकांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी प्रशांत भाऊ हे नेहमीच आग्रही राहत असल्याने किनवट तालुक्यातील सावरगाव येथील आदिवासी समाजातील अनाथ मुलीच्या लग्नाची अडचण कानी पडताच प्रशांत भाऊ राठोड यांनी तात्काळ धाव घेऊन तिच्या लग्नाचे पालकत्व स्वीकारले. तसेच लग्नाकरिता लागणारा आर्थिक भार देखील उचलला. त्यामुळे आदिवासी समाजाबरोबरच संपूर्ण किनवट- माहूर परिसरात श्री. प्रशांत भाऊ राठोड यांच्यावर त्यांचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कुठल्याही राजकीय आणि इतर लाभाची अपेक्षा न ठेवता प्रशांत भाऊ राठोड यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक गाव , वाडी, खेडे आणि तांड्यात अडचणीत असलेल्या नागरिकांना सर्व प्रकारची मदत करण्यात येते. गावागावात टँकरने पाणीपुरवठा करण्यासोबतच जंगलातही जंगली जनावरांसाठी पानवठे तयार करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच लग्नकार्य आणि इतरही सामाजिक कार्यात सेवा संकल्प प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रशांत भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस नागरिकांची जमेल तशी मदत करत आहेत. त्यामुळे दीनदुबळ्यांची सेवा करण्याची सुरुवातीपासूनच आवड आणि परिवारातूनच जडणघडण झालेले प्रशांत भाऊ राठोड यांची जननायक लोकनेता म्हणून नागरिकांच्या मनात जागा निर्माण झालेली आहे.
किनवट तालुक्यातील मौजे सावरगाव येथील पुजा मुरमुरे हिच्या घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे लग्न पुढे ढकलावे लागेल ,अशी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती प्रशांत भाऊ राठोड यांना मिळताच त्यांनी तात्काळ सावरगाव येथे सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह जाऊन अनाथ पुजाच्या लग्नाचे पालकत्व स्वीकारून पुराच्या नातेवाईकांना गावकऱ्यांसमक्ष लग्नाचा संपूर्ण खर्च सुपूर्द केला. त्यामुळे आदिवासी समाजातून त्यांच्या या कार्याचे भरभरून कौतुक होत असून इतरही नागरिक अशा प्रकारच्या कार्यात आपणही सहभागी होऊ, अशी इच्छा व्यक्त करताना दिसत होते. यावेळी ईश्वर जाधव, बंडू राठोड,दिनेश पवार,प्रदीप पवार, पांडु राठोड, अविनाश राठोड, दीपक चव्हाणांसह सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, नायक आणि सावरगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.