नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगांव – येथील जुना मोंढा खाटीक गल्लीतील कत्तलखान्यावर धाड टाकून पोलिसांनी जवळपास १२४९० रू. किमतीचे गोवंश मांस जप्त केले आहे. यामध्ये चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक किरण पोपळघट यांच्या नेतृत्वाखाली दि.१६ में २०२५ रोजी शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक किरण पोपळघट यांना गुप्त बातमीदाराने माहिती देवून खाटीक गल्लीतील कत्तलखान्यात गोवंश मांस असल्याचे सांगितले. त्यावरून नायगांव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गजानन तोटेवाड, पो.हे.कॉ. साई सांगवीकर सह पथकाने पंचांसह खाटीक गल्ली भागातील कत्तलखान्यावर धाड टाकली असता तेथे गोवंशाचे मांस विक्री होत असल्याचे आढळून आले.पोलीस पथकाने हे गोवंश मांस व इतर साहित्य जप्त केले. जप्त केलेले गोवंश मांस जवळपास ६२ किलो वजन भरले असून त्याची किंमत १२,४९० रुपये एवढी आहे. या घटनेत नायगांव पोलिसांनी खलील कुरेशी रा. पिंपळगाव, मगदूम कुरेशी रा. नायगाव, तौफिक कुरेशी रा. नायगाव, अजीम कुरेशी रा. नायगांव या चार जनांच्या विरुद्धात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक किरण पोपळघट यांनी दिली आहे.परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक किरण पोपळघट यांच्या नेतृत्वाखाली नायगांव शहरातील कत्तलखान्यावर करण्यात आलेल्या या कारवाईचे स्वागत होत असून अशा अवैध धंद्या विरोधातील कारवाई करून नायगाव पोलिसांनी अवैध धंदेवाल्याचे मुसक्या आवळल्याने जनतेतून कौतुक होत आहे.