सध्याच्या चालू युगात मोबाईलच्या वापरामुळे मैदानी खेळांचा विसर

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलात विविध आजारांचे प्रमाण वाढले

गेम खेळण्याच्या नादात किशोरवयीन मुला मुलींचा जुगाराकडे वाढला कल

श्रीक्षेत्र माहूर प्रतिनीधी/

माहूर सध्याच्या आधुनिक युगात नवनवीन शोध लागत असल्याने दैनंदिन जीवनात मोबाईलचा वापर वाढल्याने शारीरिक व्यायाम विविध कामे खेळांचा विसर पडत चाललेला असून लाखो रुपये खर्च करून विविध क्रीडा मैदान व क्रीडा साहित्य आठवणीतच राहणार आहे, असे चित्र निर्माण होत चालले आहे. अगोदरच्या काळात शालेय शिक्षण घेत असताना शारीरिक तास च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विविध क्रीडा खेळ शिकवले जातात आणि दिवसभर शाळेत चार वाजता सुट्टी मिळाली की घरी बच्चे कंपनी दप्तर ठेवून सायंकाळपर्यंत विविध मैदानावर मुले मुली विविध खेळ खेळत असताना पहावयास मिळत होते. आता मात्र पालकच किरकिरी नको म्हणून लहान मुलांच्या हातात मोबाईल देत असून मोबाईल गेम खेळण्याचा नादात मुले मुली कधी जुगाराकडे वळले याकडे पालकांचे लक्ष दिसत नसल्याने विविध प्रकारचे फसवणुकीचे गुन्हेही दाखल होत आहे

४ वर्षाच्या बालकाच्या हातात मोबाईल
मैदान नसेल तर चौकात कबड्डी, खो-खो, लंगडी, लपाछपी, वीटीदांडू, क्रिकेट विविध खेळ अगोदरच्या काळात शालेय शिक्षण घेत असताना शारीरिक तास माध्यमातून मोठ्या प्रमाणात विविध क्रीडा खेळ शिकवले जातात.दिवसभर विविध ठिकाणी मैदानावर सायंकाळपर्यंत गर्दी असलेली पहावयास मिळत होती, पण सध्या परिस्थितीत विविध सुविधा यांत्रिकी युगात मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून आता मोबाईल सुविधा उपलब्धय झाल्यामुळे बालकापासून तरुणवर्ग सुद्धा आता मोबाईल गेम खेळत असताना पाहाव्यास मिळत असल्याचे विविध सुविधा यांत्रिकी युगात मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या असून आता सध्याच्या काळात चार वर्षाच्या बालकाच्या हातात मोबाईल पहावयास मिळत आहे.

– विविध गेम आता मोबाईल सुविधा उपलब्ध झाल्यामुळे बालकापासून तरुण वर्ग सुद्धा आता मोबाईल गेम खेळत असताना पाहावयास मिळत असल्याचे शालेय -क्रीडा स्पर्धात फार खेळात आवड असणारीच मुले मुली स्पर्धा स्पर्धेत भाग घेत – असल्याने ठिकठिकाणी लाखो रुपये खर्च करून मैदान निर्माण केली आहे तर – विविध शालेय साहित्य शासनाकडून लाखो रुपये पुरवठा करण्यात येत असून आपण आता मोबाईल गेम खेळत असताना सायंकाळी मैदानावर विविध खेळ खेळत असताना तुरलक प्रमाणात पाहावयास मिळत आहेत. व्यस्तता वाढल्याने वीस हजारावर लोकसंख्या असूनही माहूर शहरात सकाळ संध्याकाळ फिरायला जाणाऱ्या मंडळींची संख्या बोटावर मोजन्या इतकी आहे

नवनवीन आजाराला आमंत्रण

तर शालेय स्पर्धात सुद्धा खेळात आवड असलेले सहभाग घेत आहेत कारण आता शारीरिक व्यायाम बालपण यातील मोबाईल पुढे कमी होत चाललेले असून त्या मोबाईलवर गेम खेळत असताना शारीरिक व मानसिक ताण आजचा बालपणापासूनच पडत झालेले आहे शारीरिक विविध आजाराचा विसर पडत झालेला असल्याने मोठ्या प्रमाणात विविध आजार निर्माण होत असून उपचार करण्यास डॉक्टरांकडे गेले की अगोदर आपण सायंकाळी व्यायाम करता का हा मोठ्या प्रमाणात प्रश्न रुग्णांना विचारला जातो, पण नाही म्हणता येत नाही म्हणून कधी कधी जातो, असे उडवडीची उत्तरे आपण डॉक्टरांना देतो. डॉक्टर लक्षात येते की सकाळी एक किलोमीटर कमीत कमी चालावे हा संदेश आपणास मिळतो आपणास आजार कोणताच नाही, पण व्यायाम करावा लागेल नसता नवनवीन आजार निर्माण होणार, असा आदेश डॉक्टराकडून मिळत आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या भोजंती तलावाचे काम लवकर पूर्ण करून वन विभागाचे गार्डन चे काम तात्काळ पूर्ण करत क्रीडा संकुलाचे बांधकाम तात्काळ सुरू करावे अशी मागणी अभ्यासकांकडून होत आहे

Share This Article
error: Content is protected !!