अभिलेखात खाडाखोड केल्या प्रकरणी ग्रामसेवक आर.जी.मुदखेडे निलंबित….!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे 

नायगाव – तालुक्यातील पिंपळगाव येथील ग्रामपंचायत नमुना नं. ८ या अभिलेख्याच्या शासकीय दस्तऐवजात खाडाखोड केल्याप्रकरणी जबाबदार धरून ग्रामपंचायत अधिकारी आर. जी. मुदखेडे यांना जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दि. १५ मे २०२५ रोजी निलंबित केले आहे.

ग्रामपंचायत कार्यालय, पिंपळगाव, तालुका नायगाव (खै.) येथे कार्यरत असताना येथील ग्रामपंचायत अभिलेखे नमुना नं. ८ या शासकीय दस्तऐवजात खाडाखोड तसेच संगनमत केल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यामुळे नियमाबाह्यरीत्या खाडाखोड केल्यामुळे कर्तव्यात कसूर, हलगर्जीपणा सदरचे कृत्य जाणीवपूर्वक केल्याचे आढळून येत आहे. ही बाब नियमांचा भंग करणारी आहे असा ठपका त्यांच्यावर ठेवला असून, आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे. निलंबन काळात संबंधिताचे मुख्यालय हदगाव हे राहील.

Share This Article
error: Content is protected !!