कुंटूर मंडळामध्ये विजेच्या कडकडासह वादळी वारे व अवकाळी पावसाची हजेरी…..

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 नायगाव प्रतिनिधी/ अशोक वाघमारे

नायगाव – तालुक्यातील कुंटूर मंडळ मधील हुस्सा, डोंगरगाव, सालेगाव, धनंज, मेळगाव, सांगवी,राहेर अदी गावामध्ये विजेच्या कडकडासह वादळी वारे व जोरदार पावसानी हजेरी ठीक ५:३0 दरम्यान लावली होती. सुदैवाने कुठली जीवित हनी टळली. मात्र गावातील अनेक कुटुंबातील घरावरील पत्र उडून विजेच्या तारेवर पडले आहे. यामुळे तूर्तास वीज पुरवठा खंडित झाला असून विजेचे तार तुटून पडल्याने तात्काळ संबंधित लाईनमेन गंगाधर रेडस यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून वायर जोडणी करून वीज सुरळीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहे.

    कुंटूर मंडळ मधील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यात वाऱ्याने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यामुळे कुंटूर मंडळ मधील अनेक गावातील घरावरचे पत्रे उडून बाजूला पडले आहे. मात्र यात मोठी जीवित हानी टळली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतातील भुईमुंग पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. यंदा भुईमुंग पिकाच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून शेतकरी राजा पहिलेच मोठ्या संकटात असताना यात अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षीप्रमाणे यंदा भुईमुंग पिकाच्या उत्पन्नात मोठी घट व पिकावर मोठ्या प्रमाणात करप्या व अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने हवा हवालदीन झालेल्या शेतकऱ्यांना पदरी पडला आहे. म्हणून शासनाने भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देऊन व उत्पन्नात घट झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होताना दिसून येत आहे.

 हुस्सा परिसरातील मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडासह वादळी वारा व पावसाने हजेरी लावली होती यात आमच्या शेतातील भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी भुईमूग पिकात मोठी घट झाली आहे आणि पुन्हा दुहेरी संकट वादळी वाऱ्याने घातला असून शेतातील भुईमूग पिकावर मोठे परिणाम झाले आहेत. आणि झालेल्या पिकांचे शासनाकडून कुठली तरी मदत मिळावी अशी अपेक्षा आमच्या शेतकऱ्यांची आहे. आणि हुस्सा येथील अनेक घरावरील पत्रे उडून गेले आहेत व भाजीपाल्यांचे आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी हुस्सा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Share This Article
error: Content is protected !!