नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – शहरातील शिवाजीनगर लालवाडी नांदेड येथील रहिवाशी विश्वजीत विजय कठारे या विद्यार्थ्याने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत ७५-६०% टक्के गुण मिळवून महात्मा फुले हायस्कूल विजय नगर नांदेडचे नाव उंचावले
याने आपल्या आई वडिलां सोबत आपल्या समाजाचे तसेच आपल्या कुटुंबियांचे देखील नाव रोशन केले आहे.साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेला विश्वजीत दहावीच्या परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल सर्व मित्रमंडळ तर्फे प्रथम तुझे खूप खूप अभिनंदन!
आज तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळालं आणि आम्हा साऱ्यांना जणू आनंदाची पर्वणी मिळालीय. दहावी म्हणजे कसोटीचं वर्ष असतं! म्हणूनच ते सचोटीनं, चिकाटीनं,जिद्दीनं आणि अभ्यासपूर्वक पार करावं लागतं.वर्षभर अभ्यासाचं ओझं आणि परीक्षेचं टेन्शन… हे शिवधनुष्य तू न घाबरता, न थकता,जिद्दीनं,चिकाटीनं आणि समजूतदारपणानं पेललं,हे खरंच कौतुकास्पद आहे.
हे यश मिळवून तू महाविद्यालयीन शिक्षणाच्या प्रवासात पहिलं यशस्वी पाऊल टाकलं आहेस.आयुष्यात असे अनेक टप्पे,अनेक चढ-उतार येतील…पण ज्या धैर्यानं तू आजची ही कसोटी पार केलीस, त्याच जिद्दीनं तू प्रत्येक परीक्षेला तोंड देशील,याचा मला पूर्ण विश्वास आहे.
आजच्या युगात मुलानी शिक्षित, स्वावलंबी आणि कर्तृत्ववान बनलं पाहिजे.कारण शिक्षण हे केवळ गुण मिळवण्यासाठी नाही,तर आपल्या पायावर उभं राहण्यासाठी,विचार करण्यासाठी,समाजात बदल घडवण्यासाठी आवश्यक आहे.कारण शिक्षण हेच खरं भांडवल आहे.
हेच भांडवल तुलाही भविष्यात मोठं करेल,आत्मनिर्भर बनवेल. आज प्रत्येक ठिकाणी टक्क्यांची भाषा बोलली जाते. पण तू अभ्यासाने मिळविलेला प्रत्येक टक्का अमूल्य आहे. तू मेहनतीने मिळवलेला प्रत्येक गुण तुझ्या कष्टाचा आणि आई-वडिलांच्या संस्कारांचा सन्मान करणारा आहे.
अशीच जिद्द ठेव.पुढं जात राहा.समाजाला अभिमान वाटेल असं कर्तृत्व कर.माझा आशीर्वादाचा हात कायम तुझ्या पाठीवर असेल.तुला खूप आशीर्वाद.यशस्वी,सुखी आणि सशक्त आयुष्याच्या दिशेने वाटचाल कर.
वडिलांची आईची माया नेहमी तुझ्या पाठीशी असेल.