राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त मुदखेड ग्रामीण भाजपाने त्री मुखी महादेव मंदिर परिसरात केले स्वच्छता अभियान…

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

मुदखेड ता. प्रतिनिधी/राहुल कोलते 

मुदखेड – येथील आमदुरा येथिल हेमाड पंथीय जागृत त्रिमूखी हनुमान मंदिर परिसरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्री शताब्दी जयंतीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने संबंध देशभर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पासून ते जयंती दिना पर्यंत विविध उपक्रम राबवून अहिल्या देवींचा इतिहास गावकुसापर्यंत पोहचविण्याचा संकल्प भाजपाने केला आहे.या निमित्ताने आज आमदूरा येथे अहिल्या देविना कृतिशील अभिवादन करण्यासाठी हेमाड पंथीय आमदूरा ता. मुदखेड येथील मंदिरात आरती करून, नारळ वाढविण्यात आले आणि संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याच बरोबर इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष प्रविण्या मिळवून गणित, विज्ञान विषयात पैकीच्या पैकी गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते गोविंदराव पाटील शिंदे नागेलिकर, जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड, ता.अध्यक्ष दत्तू देशमुख,कृषि उत्पन्न बाजार समिती नांदेडचे संचालक गांधी पवार, ता.उपाध्यक्ष शंकर पवार,ओबीसी आघाडी चे जिल्हा सरचिटणीस श्रीहरी बैनवाड, ता. अध्यक्ष गुलाब सूर्यवंशी माळकौठ्याचे माजी सरपंच मारुती जाधव, यांच्यासह गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदऊन अहिल्या देविना कृतिशील अभिवादन केले

Share This Article
error: Content is protected !!