नायगाव विधानसभा मतदारसंघात एकही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही – आ.राजेश पवार 

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

आ. राजेश पवार यांचे निर्देश, कामात कुचराई कराल तर कारवाईला सामोरे जाल…!

नायगाव ता.प्रतिनिधी अशोक वाघमारे

नायगावभारतातील एकही कुटूब बेघर राहता कामा नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात मोठ्या प्रमाणात घरकुल योजनेस मंजुरी दिली आहे. नुकतेच पंतप्रधान आवास योजना टप्पा-२ अंतर्गत ग्रामीण व शहरी भागात घरकुल वंचित कुटूंबाला घरकुल देण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे प्रक्रिया सुरू आहेत. हे सर्वेक्षण काटेकोरपणे करण्यात यावे; जेणेकरून कोणताही गरजू नागरिक या योजनेपासून वंचित राहणार नाही. कोणी कर्मचारी या कामात कुचराई करेल तर त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देश आ.राजेश पवार यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिले आहेत. पंतप्रधान आवास योजनेच्या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी आ. राजेश पवार यांनी शुक्रवारी दुपारी सव्वा तीन वाजता आयोजित केलेल्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला माजी जि.प. सदस्या पुनमताई पवार, जिल्हा परिषदेचे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, नायगाव विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यांचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी ग्रामसेवक आदी कर्मचारी सामील होते.

        नायगाव, उमरी, धर्माबाद या तीन तालुक्याचा चालु परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पुढे बोलताना आ.पवार म्हणाले आतापर्यंत घरकुलाचा लाभ भेटला नाही. असे अनेक व्यक्ती कुटूंब कामाच्या शोधात पुणे, मुंबई, हैदराबाद आदी ठिकाणी गेले आहेत. त्या व्यक्तीनां ग्रामसेवक सरपंच या दोघांनी सूचना देऊन बोलावून घ्यावे व त्याचे पण गावात राहुन सुध्दा अनेक कुटूब बेघर व कच्च्या घरात राहतात त्यांना पण लाभभेटला नाही असा कुटूंबानचे घरकुल सर्वेक्षण करून घ्यावे. तारीख वाढली असली तरी प्रत्येक ग्रामसेवक सतर्क राहुन घरकुल सर्वेक्षण करावे. गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यात दररोज किती सर्वेक्षण झाले यांची माहीती कळवावे, असे आ. पवार यांनी सागितंले आहेत.

Share This Article
error: Content is protected !!