तहसीलदाराने वाहीत शेतातून रस्ता देण्याचा काढला आदेश ; शेतमालक विवंचनेत !

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे

 नांदेड – नांदेड येथून जवळच आसलेल्या लोहगाव (ता.बिलोली ) येथील अल्पभूधारक शेतकरी नामे श्रीमती कुसुम रामकिशन बासटवार , लक्ष्मीकांत रामकिशन बासटवार , दत्ता विठोबा पांढरे , बालाजी दत्ता पांढरे यांच्या मालकीच्या वहीत शेतामधून रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा असा एकतर्फी आदेश बिलोली तहसीलदाराने काढल्यामुळे सदरील दोनही शेतकरी कुटुंबीय मानसिक विवंचनेत सापडले आहेत .

  याबाबत अधिक ची माहिती अशी की नांदेड हैदराबाद राज्य महामार्गावर लोहगाव (ता.बिलोली ) येथे बासटवार यांचे शेत गट क्रमांक ६३६ , ६३८ व पांढरे यांचे शेत गट क्रमांक २९४ , ३४६ हे यांच्या मालकीची वहीत शेतजमीनी आहेत मात्र त्यांच्या दक्षिण बाजूच्या मागील शेतकऱ्यांना त्यांच्या शेताला जाण्यासाठी पश्चिम बाजूने अधिकृत पांदण रस्ता आहे याची स्थळ पहानी केली असताना देखील सदरील पांदन रस्ता नादुरुस्त आसल्याचे कारन लावून अर्जदार लक्षमीकांत बासटवार यांच्या वहीत शेतातून साडेआठ फुटाचा तर दत्ता पांढरे यांच्या वाहीत सेतातून सव्वा आठ फुटाचा रस्ता नव्याने उपलब्ध करून द्यावा असा अन्यायकारक आदेश बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी दिनांक ७ मे २०२५ रोजी निर्गमीत केले . सदरील आदेश हा गाव नकाशाचे अवलोकन न करता कोणताही महसुली पुरावा उपलब्ध नसताना अधिकाराचा गैरवापर करून निर्गमीत केला . 

    याप्रकरणी लक्षमीकांत बासटवार यांनी दिनांक १ मे २०२५ महाराष्ट्रदिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता मात्र त्यादिवसी त्यांना ग्राम महसुल अधिकारी शेषेराव भालेराव हे गाठले आणि योग्य निर्णय देवू म्हणून आत्मदहन रोखण्याचा जवाब लिहून घेतला होता. त्या अगोदार तत्कालीन उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये दिनांक ५ अॉगष्ट २०२४ रोजी स्पष्ट निकाल दिला होता की , कोणताही महसुली पुरावा उपलब्ध नसताना सदरील वाहीत शेतामधून रस्ता देण्यात येऊ नये दिलेला आदेश रद्द करावा असे तत्कालीन तहसीलदास आदेशीत केले होते . मात्र उपविभागीय अधिकाऱ्याच्या निकालाला केराची टोपली दाखवून गैरअर्जदारांना पाठीसी घालत तहसीलदार गजानन शिंदे यांनी पुनश्च शेतातून रस्ता देण्याचा आदेश निर्गमित केला . त्यामुळे बासटवार व पांढरे कुटूंबिय तहसीलदाराच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगीतले आहे .

Share This Article
error: Content is protected !!