आर्य वैश्य समाजाचे कुलदैवत वासवी माता मंदिराच्या बांधकामासाठी 21 लाख रुपये निधी देणार- खा रवींद्र पाटील चव्हाण  

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे

नायगाव – येथील आर्य वैश्य समाज बांधव सदैव आमच्या सुख दुःखात राजकीय जडण घडीच्या काळात दीर्घ काळापासून घनिष्ठ संबंध असून आम्ही ते कधीही विसरणार नाही माझ्या वडिलांनी दिलेले शब्द पाच वर्षाच्या काळात पूर्ण करेल काही दिवसातच आर्य वैश्य समाज बांधवांची कुलस्वामिनी कन्याका परमेश्वरी मातेच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून बांधकामासाठी 21 लाख रुपये निधी देण्याचे अभिवाचन नायगाव आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने आयोजित केलेल्या वासवी कन्या का परमेश्वरी माता जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी अध्यक्ष समारोप प्रसंगी खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त केले.

     नायगाव येथील आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने समाजाची कुलस्वामिनी कन्याका वासवी परमेश्वरी मातेच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जुन्या गावातील हनुमान मंदिरात पूजा आरती करून मंदिरापासून भव्य दिव्य घोड्याच्या रथात देवीची मूर्ती बसऊन रथयात्रा शिवाजी चौक. हेडगेवार चौक. मुख्य रस्त्या वरून सतीश सावकार मेडेवार यांच्या ऑइल मिल पर्यंत रथयात्रा ढोल ताशाच्या गजरात अतिश बाजी करत भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली यामध्ये महिला पुरुष बालगोपाळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरवणूक कार्यक्रमाच्या स्थळी आल्यानंतर वासवी मातेची विधिवत पूजा. कुंकूम अर्चना महाआरती करण्यात आली जन्मोत्सव सोहळा प्रसंगी आलेल्या समाज बांधवांनी पुलगामा येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली नंतर प्रमुख मान्यवरांचा सन्मान समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे महासचिव गोविंदराव बिडवई, माजी पंचायत समिती सदस्य हनमंतराव पाटील चव्हाण.उपाध्यक्ष नंदकुमार माडगूलवार, प्रसिद्ध उद्योगपती श्रीराम सेठ मेडेवार. समन्वय समिती अध्यक्ष बालाजी बच्चेवार. संजय बेळगे.सहसचिव प्रणव मनुरवार.बांधकाम समिती सचिव सदानंद मेडेवार. बांधकाम समिती सदस्य बिपीन गादेवार. विजयकुमार कुंचनवार.शंकरराव देबडवार. जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय चौधरी. प्रदीप मनाठकर. चंद्रकांत सा कवटीकवार. बालाजी सा चिंतावार. गोविंदराव पोलावार. वसंतराव मेडेवार.बाबु सा अरगुलवार. समाजाचे अध्यक्ष सतीश मेडेवार. उपाध्यक्ष गजानन चौधरी. सचिव कपिलेश्वर नलबलवार. कोषाध्यक्ष सूर्यकांत कवटिकवार. सतीश लोकमनवार. सचिन चिद्रावार. साईनाथ वट्टमवार. रमेश मेडेवार. साईनाथ मेडेवार.श्रीनिवास गडपलेवार. जगदीश प्रतापवार. विनोद गंदेवार बालाजी मेडेवार. संगम गंदेवार. मनोज अरगुलवार.आशिष मामीडवार. धनंजय कवटीकवार. मनोहर गादेवार. अविनाश चालीकवार. शंकर सावकार काशटवार. सुभाष चलावार. साईनाथ गुंडाळे. कैलास कवटिकवार. संजय मामीडवार. गजानन गादेवार. त्र्यंबक मुनगिलवार. आर्य वैश्य समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!