पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षा निमित्त भाजपाच्या वतीने महादेव मंदिर व परिसर स्वछता – खा.चव्हाण,खा. गोपछडे यांची प्रमुख उपस्थिती

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड प्रति. हरजिंदर सिंघ संधू

नांदेड पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने शुक्रवार दि. 23 मे रोजी सकाळी शहराच्या चैतन्यनगर येथील श्री महादेव मंदिर व परिसरात स्वछता व मंदिरात माजी मुख्यमंत्री,खा. अशोकराव चव्हाण ,खा. अजित गोपछडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

   यावेळी भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे,महानगर अध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर,प्रदेश प्रतिनिधी चैतन्यबापू देशमुख,माजी महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे ,महानगरचे माजी सरचिटणीस मोहनसिंह तौर,संतोष मुळे,माजी नगरसेवक दीपकसिह रावत,मिलींद देशमुख ,शीतल खांडील ,स.दिलीपसिंग सोडी ,माजी नगरसेवक विनायक सगर,विपुल मोळके,माधवराव पटणे,व्यकंट मोकले ,प्रा. प्रभाकर उदगिरे ,आनंद पावडे,तुलजाराम उर्फ बागड्या यादव,विशाल शुक्ला,निलेश कुंटूरकर,संदीप पावडे ,अनिलसिंह हजारी, सखाराम तुप्पेकर, माजी नगरसेविका कविता मुळे,संगीता तुप्पेकर, महानगर सरचिटणीस अमोल कदम, मनोज जाधव,हरजिंदर सिंघ संधू , उद्योजक जयदत्त ततापूरे, गुरुदीपसिंघ संधू, माजी नगरसेवक दत्ता कोकाटे, मंडळ अध्यक्ष सुनिल राणे, किशन कल्याणकर, सदाशिव पुरी, कैलास सावते, मानिक देशमुख, बाळासाहेब उर्फ बन्नू देशमुख, विनोद देशमुख, बालाजी काळे, मुरारी कुंमारगावे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या प्रसंगी अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक कार्य, न्यायप्रियतेची परंपरा आणि जनसेवेतील योगदान याचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या आदर्श जीवनशैलीचा आदर्श घेऊन समाजसेवेची प्रेरणा घेण्याचा निर्धार व्यक्त केला.या कार्यक्रमातून स्वछता व सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला आहे.

Share This Article
error: Content is protected !!