आ.केराम यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यादव यांनी पडसा येथे केला शासनाच्या अभिनंदनीय उपक्रमाचा शुभारंभ
माहूर तालुका प्रतिनिधी/
माहूर – दि. 24 मे : महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेसह सर्व प्रकारच्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा शासनाच्या अभिनव अशा स्वप्नपूर्ती संकल्पाचा शुभारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सूचनेनुसार ,आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव यांनी मौजे पडसा, वडसा व टाकळी येथून शनिवारी केला.
घरपोच मोफत पाच ब्रास वाळू मिळत असल्याने घरकुल लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.शासनाच्या या अभिनंदनिय उपक्रमाबद्दल घरकूल लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,आमदार भीमराव केराम, सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र दोंथूला आणि तहसिलदार किशोर यादव यांचे आभार मानले आहे. सोमवार २६ मे पासून माहूर शहरासह तालुक्यातील घरकुल योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तहसिलदार यादव यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतील घेतलेल्या ८ आणि ३० एप्रिल २०२५ शासन महाराष्ट्रातील मंजूर असलेल्या सर्व घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना उपलब्ध होईल तिथून पाच ब्रास मोफत वाळू देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्यासाठी वाळू उपलब्धतेची चाचणी करण्यात येत होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र दोंथूला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव,नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड, नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सर्व मंडळ अधिकारी, तलाठ्यांना सोबत घेऊन वाळू स्त्रोतांची पाहणी करून दि.२४ मे रोजी मौजे पडसा येथून मोफत वाळू वाटप योजनेचा शुभारंभ केला.
यावेळी आमदार भीमराव केराम हे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. त्यांनी घरकुल लाभार्थ्यांशी संवाद साधत मोफत वाळू योजनेचा लाभासाठी सदिच्छा दिल्या.तर महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार यादव व अधिनस्थ अधिकारी, कर्मचारी यांनी वाळूगटावरुन वाळू वाटप सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी तहसीलदार किशोर यादव,नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड,सरपंच रुखमाबाई आरके,भाजपाचे तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के,भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल वाघमारे,नगरसेवक गोपू महामुने,उपसरपंच बाबाराव चौधरी, विलास पाटील चौधरी, प्रकाश गायकवाड,किसनराव मारबते, नंदकुमार जोशी, विजय आमले, हर्षदीप दीक्षित,कुलदीप घोडेकर, आनंदा हिंगाडे, निलेश तायडे, अविनाश भोयर,विनायक मुसळे,शेख इमरान, जितू चोले, शेख मोईज तसेच लाभार्थी बंडू शेवाळे,शेंडे, शुभम भवरे यांचेसह लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही प्रशासकीय कार्यात एक कर्तव्यकार्यतत्पर तालुका प्रशासकीय अधिकारी म्हणून महसूल प्रशासनात तर वेळोवेळी सर्वसामान्यांच्या हिताचे तडकाफडकी निर्णय घेत जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी यावेळीही घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप करण्यात धडाकेबाज निर्णय घेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून सर्वात प्रथम पुढाकार घेऊन माहूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना सर्वात आधी वाळू उपलब्ध करून दिल्याबद्दल,त्यांचा वडसा,पडसा व टाकळी या तिन्ही गावातील नागरिकांकडून जाहीर सत्कार करण्यात आला.