माहूर तालुका प्रतिनिधी बजरंगसिंह हजारी
माहूर – दि. २४ मे : येथील शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख स्व. निरधारी जाधव उर्फ आण्णा यांच्या हसतमुख स्मृतीज्योति माहूरकरांसह त्यांच्याशी स्नेहांकीत असलेल्या संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मनात कायम तेवत राहव्यात या आपुलकीच्याभावनेने प्रभाग क्रमांक ०२ मधील आबासाहेब पारवेकर नगर येथे “आण्णा चौक” फलकाचे अनावरण शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी २१ मे रोजी करण्यात आले.
उबाठा गट शिवसेना शहरप्रमुख,माहूर निरधारी जाधव यांचे नुकतेच ०९ मे रोजी धक्कादायक दुःखद निधन झाले. स्व.निरधारी जाधव हे साधारणपणे १९९८ सारी गजानन प्रिंटर्सच्या माध्यमातून व्यवसायात उतरले होते. आपल्या विलक्षण तांत्रिक बुद्धीमतेच्या जोरावर त्यांनी माहूर शहरात स्क्रिन प्रिंटिंगला सुरुवात केली. याही पलीकडे जात सन २००५ पासून हयातीत असेपर्यंत दिवंगत निरधारी यांनी ऑपसेट प्रिंटिंगच्या माध्यमातून तालुका व परिसरातील जनतेला वाजवी दरात विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. याच दरम्यान एक कुशल संगणक चालक म्हणूनही त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाच्या व्यवसायात देखील मोठे नाव कमावले. साधारणतः सन २०१० पर्यंत जोपर्यंत स्मार्टफोन, ॲन्ड्रॉइड या परिसरात पोहचले नव्हते त्याकाळी प्रिंट मिडिया च्या प्रतिनिधिंना तसेच कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने नागरिकांना बातम्या, महत्त्वाची कागदपत्रे ही फॅक्स मशीनद्वारे पाठवावी लागत असे ती संगणकावर टायपिंग करून माहूर शहरात एकमेव निरधारी आण्णाच देत असे. महत्वाची गोष्ट म्हणजे स्वताचा कॉम्प्युटर जॉब वर्कचा व्यवसाय करीत असतानाच विविध क्षेत्रातील भरपूर माहिती मिळत गेल्याने कॉम्प्युटवर टाईपिंग लिखाण करत करतच त्यांनी लिखाणाची गोडी असल्याने पत्रकारीतेच्या क्षेत्रात प्रवेश केला. एक पत्रकार म्हणून बरीच वर्षे त्यांनी वर्तमानपत्रात माहूर प्रतिनिधी म्हणून देखील यशस्वीपणे भुमिका पार पाडली.
विशेष म्हणजे याच दरम्यान, त्यांनी राजकारणातदेखील पाऊल ठेवले तत्कालीन एकसंध शिवसेनेचे माहूर शहर प्रमुख म्हणून ते २००५ ते २०२५ म्हणजे मृत्यू पर्यंत ते सतत वीस वर्षांच्या दिर्घ काळासाठी राहिले.
यावरुनच त्यांनी पक्षासाठी व जनतेच्या अडीअडचणी व सामाजिक कार्यासाठी आपले खुप मोठे योगदान दिले असल्याचे दिसून येते. जाधव हे शिवसैनिक जरी असले तरी सर्वधर्मसमभाव जोपासत ते प्रत्येकाच्या अडिअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घ्यायचे. जनसमर्पण भावनेच्या विविध कार्यशैलीवरुन हरहुन्नरी निरधारी जाधव यांना सर्वजण “आण्णा” म्हणून संबोधित करायचे.
अशा कितीतरी जनसेवा स्मृतींच्या ज्योती ह्या स्व.निरधारी जाधवांच्या आहेत.आणि त्या लोकांच्या मनात ताज्यातवान्या स्वरुपात कायम तेवत राहाव्यात या भावनेतून उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे अर्थातच शहर,तालुका व संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक व स्नेहांकित परिवाराच्यावतीने
स्व. निरधारी जाधव यांच्या पत्नी आशाताई निरधारी जाधव ज्या नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक 2 च्या विद्यमान नगरसेविका आहेत, प्रभागात खुप मोठ्या प्रमाणावर असलेल्या दिवंगत निरधारी यांच्या चाहता वर्गाच्या इच्छेनुसार निर्णय घेऊन रहदारीस अडथळा होणार नाही अशा ठिकाणी “स्व.निरधारी जाधव अमर रहे! “अण्णा चौक” अशी नामस्मृती दर्शविणाऱ्या नाम फलकाच्या चौकाची स्थापना केली.
यावेळी शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांचेसह उपजिल्हाप्रमुख अनिल रुणवाल, माजी पंचायत समिती सभापती मारुती रेकुलवार, नगरसेवक विजय कामटकर, प्राध्यापक राजाराम गंदेवाड,जितू चोले,गणेश पुरी, विजय तिवसकर, दीपक कांबळे,अशोक उप्पलवाड कनिष्क वानखेडे, प्रफुल पारसकर, शेख तोफिक,दिपक कामटेवाड, मंगेश सुकळकर,विजय मिरटकर,गोविंद पवार,गणेश इसाय, चिमनाजी लिमकर, शामराव गुजलवाड, शंकर महाराज, गजानन पवार,राजु बाबुलकर,अक्षय मार्गमवार, पत्रकार, व्यावसायिक, विविध पक्षातील राजकीय व्यक्ती यांच्यासह मध्य आशियातील देश किर्गिज़स्तान येथे एमबीबीएसच्या अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत असलेले निरधारी जाधव यांचे चिरंजीव डॉक्टर गौरव जाधव तसेच सदरील अण्णा चौक नाम फलकाच्या स्थापनेसाठी ज्यांचे विशेष योगदान लाभलेले आहेत असे कट्टर शिवसैनिक गजानन चव्हाण, वसीम शेख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.