पत्रकार तथा कवी देविदास सूर्यवंशी यांच्या कवितेला छत्रपती संभाजीनगर मध्ये सन्मानचिन्ह

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नायगाव प्रतिनिधी:- अशोक वाघमारे

नायगाव – छत्रपती संभाजीनगर येथे वारसा साहित्य मंचच्या वतीने दि.२५ मे रोजी रविवारी पार पडलेल्या कविसंमेलनात नायगाव तालुक्यातील नरसी येथील पत्रकार तथा कवी देविदास सूर्यवंशी यांनी सादर केलेल्या ‘झाडे लावा’ या कवितेला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आल्याने सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

       वारसा साहित्य मंचच्या वतीने अनेक लेखक व कवी यांनी आपल्या कसदार साहित्यकृतीतून ‘वारसा’ हे वाचनीय पुस्तक साकारले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते यांच्या हस्ते होऊन भव्य कविसंमेलन पार पडले. यामध्ये नरसी तालुका नायगाव येथील पत्रकार तथा कवी देविदास सूर्यवंशी यांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली. वारसा साहित्य मंचतर्फे या कवितेसाठी देविदास सूर्यवंशी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सम्मानित केल्याने त्यांचे जेष्ठ पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर, भुषण पारळकर, गंगाधर गंगासागरे, पंडीत वाघमारे, गोविंद टोकलवाड अशोक वाघमारे सह पत्रकार व मित्र मंडळी यांनी अभिनंदन केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!