माहूरकरांना दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी होत असे प्रचंड त्रास
गेल्या अनेक वर्षापासून पाणीटंचाई होऊ नये म्हणून यशस्वी जल व्यवस्थापन करण्यात नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यशस्वी
पैनगंगा नदीवर बंधारा व्हावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश भविष्यात कधीही पाणीटंचाई होऊ नये म्हणून केलेला पाठपुरावा यशस्वी
श्रीक्षेत्र माहूर/ इलियास बावाणी
माहूर – श्रीक्षेत्र माहूर गडाला वळसा घालून गेलेली पैनगंगा नदी ऊराशी असताना कमकुवत नळ योजना तसेच व्यवस्थापनाच्या अभावामुळे ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून माहूर शहराला प्रत्येक उन्हाळ्यात प्रचंड पाणीटंचाई जाणवत होती नगराध्यक्ष पदी फिरोज भाई दोसांनी विराजमान होताच त्यांनी नवीन नळ योजनेसाठी शासन दरबारी गेलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून मंजूर झालेल्या नळ योजनेच्या पाईपलाईन्स शहरात व्यवस्थित टाकून शहरातील प्रत्येक घरात मुबलक पाणी जावे शहराला भर उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे गेल्या अनेक वर्षापासून उन्हाळ्यात तसेच यावर्षीही प्रचंड उष्णता मानाच्या काळात माहूरकरांना एक दिवस दोन दिवस आड भरपूर पाणीपुरवठा केल्याने त्यांच्या केलेल्या सर्व प्रकरणांना यश आले असून पैनगंगा नदी पात्रावर होत असलेला मोठ्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यास माहूरकरांना भविष्यात कधीही पाणीटंचाईच जाणवणार नाही असे नियोजन केल्याने माहूरकरातून त्यांचे अभिनंदन होत असून पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर झाल्याने विद्यमान नगराध्यक्ष फिरोज भाई दोसांनी यांचे सह मुख्याधिकारी विवेक कांदे कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी नगरसेवकांचा कर्तव्यदक्ष लोकसेवक म्हणून माहूरकराकडून हृदय नागरी सत्कार होणार आहे
माहूरच्या नगराध्यक्षपदी फिरोज भाई दोसानी यांची तिसऱ्यांदा वर्णी लागल्याने त्यांनी नगराध्यक्ष पदाची हॅट्रिक पूर्ण केली असून त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक मुख्याधिकारी आले त्यांच्याकडून योजनेचे काम पूर्ण झाले नसताना तसेच पैनगंगा नदी पात्रात थेंबभर पाणी नसताना त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून माहूर शहरातील भोजंती तलावातील पाणी नागरिकांना नळ योजनेद्वारे पाजून एक वेगळाच विक्रम स्वतःच्या नावे करून घेतलेला आहे त्या काळात नागरिकांची प्रचंड दुवा मिळविलेल्या नगराध्यक्षांनी पुन्हा नदीपात्रात पाण्याचा ठणठणाट होऊ नये म्हणून प्रत्येक उन्हाळ्यात शासन दरबारी पाठपुरा करून नदीपात्रात पाणी सोडावयास लावून माहूरकरांना भर उन्हाळ्यात एक ते दोन दिवस पाणीपुरवठा करून प्रचंड आशीर्वाद मिळवलेले असल्याने नगरसेवकांनी तिसऱ्यांदा त्यांना नगराध्यक्ष पदावर बिनविरोध बसविले आहे तिसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाची माळ नागरिकांच्या आशीर्वादाने शासनाच्या आदेशाने झाल्याने खरोखर लोकसेवक कसा असावा याचे उदाहरण म्हणून विद्यमान नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांनी संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे
कोणतेही काम असो ते दर्जेदार करीन या मतावर ठाम राहून त्या प्रकारची कामे करण्यात नगराध्यक्ष फिरोज भाई दोसांनी यशस्वी झाल्याने आज भोजंता तलावाचे काम अंतिम टप्प्यात असून या कामाची चर्चा नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात होत असून भगवान गौतम बुद्ध पुतळा परिसरातील टुमदार आणि आकर्षक झालेली इमारत तसेच शहरातील रस्ते सर्व धर्म समशानभूमीत झालेली विकास कामे डम्पिंग ग्राउंड मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे कुमारी विद्या कदम यांच्या काळात झालेली विकास कामे गांडूळ खत प्रकल्प अग्निशमन इमारत शहरातील सौर ऊर्जा हायमास्ट हजारोच्या संख्येने पूर्ण झालेली घरकुले यासह अशी अनेक कामे पूर्णत्वास दिली असून जी याआधी कधीच झालेली नाही त्यामुळे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसांनी यांचा कार्यकाळ माहूरच्या इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा यशस्वी ठरलेला आहे
स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेली कामे इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षराने लिहिणारी ठरल्याने त्यांच्या नावाने शहरात ठिकठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली शहराला लाभलेले सर्व मुख्याधिकारी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड लेखापाल वैजनाथ स्वामी यांचे सह सर्व नगरसेवकांनी माहूरला गेल्या पाच वर्षात तरी पाणी टंचाई भासू दिली नाही दहा वर्षा आधी टँकर साठीच आठ दिवसा आधी नंबर लावून ठेवावं लागत होता तसेच माहूर शहरातील ग्रामीण रुग्णालयाला पाईपलाईनच्या अडचणी आल्याने अनेक वर्षापासून टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आता मोठा बंधारा होत असल्याने माहूर शहरातच आणखी स्टॉक टाके उभारण्याच्या हालचाली सुरू असून नवरात्रोत्सव काळा काळात भाविकांना आलेल्या लाखो भाविकांना टँकरच्या पाण्यासह बिसलरी बॉटल चे वाटप केले जात आहे या कामात त्यांना कार्यालय आधीक्षक वैजनाथ स्वामी यांची मोलाची साथ लाभलेली आहे तसेच विकास कामात जिल्ह्यात अग्रेसर ठरलेली तसेच स्वच्छता अभियानात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळविलेली स्वच्छता अभियानाला महास्वच्छता अभियानाचे नाव देणारी माहूर नगर
नगरपंचायत आणि नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांचे शहरवासीयांसह सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांकडून त्यांचा ह्रदय नागरी सत्कार होणार असल्याने हा सत्कार सोहळा खरोखरच माहूर सह नांदेड जिल्ह्याचे नावलौकिकात चार चांद लावणारा ठरेल यात शंका नाही