पत्रकार संजय सूर्यवंशी यांना संरक्षण द्या;आ.बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वर कार्यवाही करण्याची मागणी!
माहूर:- हदगाव येथील पत्रकार संजय सूर्यवंशी यांना आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आ.बाबुराव कदम कोहळीकर त्यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायदांतर्गत कारवाई करावी अशी मागणी माहूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
हदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार संजय सूर्यवंशी यांना हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आ. बाबुराव कदम कोहळीकर अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पत्रकार संजय सूर्यवंशी व त्यांचा परिवार आ. बाबुराव कदम यांच्या धमकीने घाबरून गेला आहे. दहशतीत आपले जीवन जगत आहेत. आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे
या प्रकरणी त्यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायदांतर्गत कारवाई करावी, व पत्रकार संजय सूर्यवंशी यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी, सचिव राजकुमार पडलवार,जयकुमार अडकीने, गजानन भारती,दत्ता शेरेकर,राज ठाकूर,बालाजी कोंडे,संजय सोनटक्के,राजकीरण देशमुख,इलियास बावानी,विश्वास पांडगळे,कैलास बेहरे,अविनाश टनमने ,अजय कुमार कंधारे, डॉ.जयप्रकाश द्रोणावर,साजिद खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.