बनावट जन्म दाखला बांगलादेशाशी संबंधित असू शकते- किरीट सोमय्या

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : बनावट जन्म दाखला काढल्या प्रकरणात स्थानिक नेत्यांसह अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे. 

     बनावट जन्म दाखला हा मोठा घोटाळा असून येत्या दहा दिवसात या प्रकरणात मोठी उलघड होणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.या प्रकारणाची माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या यांनी आज अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस ठाण्याला भेट दिली.अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून तब्बल ८२ बनावट जन्म दाखला देण्यात आल्याचा प्रकार काही दिवसा पूर्वी उगडकीस आला होता. पुणे पासपोर्ट कार्यालयाच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस आला.

     रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याने नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही मारून शिक्का वापरून ८२ जणांना बनावट जन्मदाखला वाटप केले.या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशी कनेक्शन आहे का नाही लवकरच उघडकीस येणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

           सदरील प्रकरणात तपासणी अधिकारी बदलल्याचेही यावेळी सांगण्यात आले सकाळी अर्धापूर पोलीस स्थानकात उपस्थित होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना मिळतात त्यांनीही अर्धापूर पोलीस स्टेशन गाठले सदरील प्रकरणांमध्ये स्थानिक च्या नेत्याचं नाव असल्याने चर्चेला उधाण आले आहे सदरील मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा असून अर्धापूर तालुक्यावर अशोकराव चव्हाण गटाची पकड आहे यामुळे या प्रकरणाला काय वळण मिळते हा चर्चेचा विषय झाला आहे.

Share This Article
error: Content is protected !!