नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मदुराई येथे झालेल्या पक्ष काँग्रेसच्या रिपोर्टिंगचा विभागीय कार्यक्रम नांदेड येथील ताज पाटील हॉटेल मध्ये २७ मे रोजी घेण्यात आला.
पक्षाचे नवनिर्वाचित राज्य सचिव व केंद्रीय कमिटी सदस्य कॉ.डॉ.अजित नवले यांनी पक्ष काँग्रेस रिपोर्टिंगचे विश्लेषण सोप्या भाषेत मांडणी करून प्रभावीपणे प्रतिनिधी समोर मांडले.
रिपोर्टींग सभेच्या अध्यक्षस्थानी माकप राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. विजय गाभने हे होते.प्रास्ताविक नांदेड जिल्हा सचिव कॉ शंकर सिडाम यांनी केले. यावेळी मंचावर कॉ.उद्धव पौळ,कॉ.भगवान भोजणे, कॉ अजय बुरांडे,कॉ. बब्रुवान पोटभरे, कॉ.मारोती खंदारे,कॉ रोहिदास जाधव आदींची उपस्थिती होती.
मराठवाडा विभागातून एकूण ११८ प्रतिनिधी उपरोक्त विचार मंथन कार्यक्रमाला उपस्थित होते.
माकप केंद्रीय कमिटीने निश्चित केलेली आगामी त्रेवार्षिक लढ्याची रणनीती, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्ष काँग्रेसने केलेल्या मार्गदर्शक तत्वावर चर्चा करण्यात आली.
राज्य सचिवांनी केलेल्या मांडणी वर काही निवडक प्रतिनिधीनी प्रश्न विचारून चर्चेत भाग घेतला त्या प्रश्नांना कॉ. अजित नवले यांनी उत्तरे दिली.
विभागीय रिपोर्टींग सभेच्या कार्यनाक्रमाचा समारोप सभेचे अध्यक्ष कॉ.विजय गाभणे यांनी केला तर आभार कॉ.उज्वला पडलवार यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्हा कमिटीने प्रयत्न केले तर हॉल व परिसर सजावटीसाठी माकप कॉ.जयराज गायकवाड,कॉ.पवन जगडमवार, कॉ. प्रफुल कऊडकर, कॉ.तेजस गायकवाड यांनी परिश्रम घेतले.स्वयंसेवक म्हणून धरती महाजन, नेहा कऊडकर, कॉ.श्याम सरोदे आदींनी जबाबदारी पार पाडली.कॉ सदाशिव साबळे व कॉ.जितेंद्र चोपडे यांनी हॉलमध्ये लावलेल्या पुस्तकांच्या स्टॉल मधून अनेक कार्यकर्त्यांनी पुस्तके विकत घेतली आहे.