सुट्टीचे आदेश असताना सुद्धा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासक यांनी केले जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उलंघन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड शहर प्रतिनिधी/
नांदेड :
हिंदु सण भाऊ बहिणीच्या पवित्र अशा रक्षाबंधन सणाच्या दिवशी 30 ऑगस्ट रोजी चे जिल्हाधिकारी यांनी शासनाचे परिपत्रक क्रमांक 5841 काढून आदेश देऊन सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न करता आणि राज्याचे महामहीम राज्यपाल डॉ रमेश बैस यांनाही अंधारात ठेऊन विद्यापीठ प्रशासक यांनी सर्वांचे उल्लंघन केले असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासक यांनी जाणून बुजून रक्षाबंधनाच्या दिवशी अधिसभा बैठक आयोजित करण्यात आली त्याचे सभा व निवडणूक अधिसभा बैठक परिपत्रक क्रमांक 478 काढून सर्व विद्यापीठ विभागाला आदेश देऊन हजर राहण्यास सांगितले आहे , रक्षाबंधन हा सण वर्षातून एकदाच येतो आणि त्यावरही हुकूमशाही करून त्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या व सर्व स्टाफ यांच्यावर एक प्रकारे अन्याय करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे ह्या प्रकरणाची वाचा फोडण्यासाठी आणि विद्यापीठात कार्यरत असलेल्या सर्व महिला, पुरूष अधिकारी आणि कर्मचारी यांना रक्षाबंधन सण साजरा करता यावा या उद्देशाने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख शिवकुमार विठ्ठलराव काळे यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले ह्या वेळी श्री रुखामाजी व्यंकटराव काळे, आदी उपस्थित होते

Share This Article
error: Content is protected !!