राष्ट्रसंत द.भ.प.श्री.साईनाथ महाराज यांची महाराष्ट्र राज्य स्वच्छता दूत ब्रॅण्ड अम्बेसिडर पदी निवड झाल्याबद्दल गोल्ला गोल्लेवार यादव महासंघाच्या वतीने सत्कार समारंभ..

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

संपादक/अभिषेक बकेवाड 

नांदेड – माहुर गढ आनंदबन मठाधिपती महंत द.भ.प.श्री.साईनाथ महाराज यांचे धार्मिक शैक्षणिक व सामाजिक सेवावृत्तीचे कार्य अहोरात्र चालत आहे.व्यसनमुक्ति, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणाचे महत्व, स्वच्छता अभियान गावोगावी जाऊन सदभक्तांच्या मनात विचार कीर्तन प्रवचनातून बिंबवतात.सदैव अन्नदान, नामस्मरण, सदाचार, परोपकार, नित्यनेमाने करण्यासाठी सामान्य माणसाला समजून सांगतात.देश,देव, धर्म या त्रिसूत्रीचा अंगीकार करुन भारत पाकिस्तान सिमेवर वाघा बॉर्डर येथे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नामस्मरण, सप्ताह शेकडोभक्तासोबत यशस्वी केला.पंजाब राज्यात गावोगावी स्वच्छता अभियान राबविले, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव म्हणून शिवनेरी ते रायगड पदयात्रा काढली.नामस्मरण, शिवाजी महाराजांच्या कार्याचा किर्तनातून गजर करीत नवचैतन्य निर्माण केले.दवाखान्यात गरीब बिमार पेशेंट व नातेवाईक यांना विनाशुल्क जेवणाचे डबे भक्तांकडून पाठवतात.साधी राहणी, ग्रामीण बोलीभाषेत सदभक्तांच्या मनात देवाबद्दल, गोरगरिबांच्या सेवेबद्दल आस्था निर्माण करतात.माणसात देव पहा, आईवडील यांची सेवा करा.इतरांना मदत करा असे सांगुन माणुसकीचे धडे शिकवतात.त्यांच्या सदैव कार्याचा आढावा घेऊन महाराष्ट्र सरकारने स्वच्छता दूत म्हणून निवड केली. त्याबद्ल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन व राष्ट्रसंत द.भ.प.श्री. साईनाथ महाराज वसमतकर, बितनाळकर बरबडेकर यांचा गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

     यावेळी गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भूमन्ना आक्केमवाड भोसीकर, सांगली जिल्ह्याचे सचिव श्री बाळासाहेब आंबे, सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष श्री मुकुंदजी शितोळे व कृष्णार्थ आंबे, समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री पी. जी. रुद्रवाड सर, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष श्री रमेशजी रामपूरवार, सचिव श्री अशोकराव कासराळीकर, कोशाध्यक्ष श्री तुकारामजी कैलवाड, कर्मचारी प्रांताध्यक्ष श्री अनुपजी अन्नमवार, कर्मचारी प्रांत सचिव श्री संदेशजी कमठे, नांदेड जिल्हा कर्मचारी कोशाध्यक्ष श्री माधवराव वटपलवाड सर, नवनिर्वाचीत गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे युवा प्रदेश अध्यक्ष श्री अभिषेकजी बक्केवाड, समाजाचे मार्गदर्शक श्री बालाजीराव शेनेवाड, श्री परशुरामजी अक्कमवाड, श्री प्रकाशराव नेरलेवाड, श्री दत्तात्रय जंगीलवाड, श्री उद्धवराव उप्परवाड, श्री सायलूजी कारेवाड, श्री देवीदासजी अक्कमवाड, हिमायतनगर शहर नवनिर्वाचीत अध्यक्ष श्री शामशेठ जक्कलवाड, माजी सैनिक श्री विकासजी बलफेवाड, श्री साईनाथजी अन्नमवाड, श्री साईनाथजी निम्मेवाड, श्री मधूकरजी मुरगुलवाड, श्री शंकर राव राऊलवाड, श्री गणेश घोसलवाड, श्री पोतण्णा राऊलवाड, श्री राजेश पुटेवाड, श्री योगेश मंत्री, गुरुदास आक्केमवाड व इतर समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!