महासभेचे चौथे अधिवेशन आयोध्येत होणार – महासभा अध्यक्ष नंदकुमार गादेवार

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे

नांदेड – महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची वार्षिक सर्वसाधारण सभा नांदेड सिडको येथील वासवी भवनात खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली.

सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार होते. तर या बैठकीस महासचिव गोविंदराव बिडवई, बांधकाम समितीचे अध्यक्ष सूर्यकांत शिरपेवार, एकनाथराव मामडे,दिलीप कंदकुर्ते, अनिल मनाठकर, सदानंद मेडेवार, नंदकुमार मडगुलवार, सुधीर पाटील, सी.ए. राहुल जिल्हेवार महिला महासभेच्या कार्याध्यक्षा सुलभाताई वट्टमवार, अध्यक्षा माधुरीताई कोल्हे, समन्वय समिती अध्यक्ष बालाजी बच्चेवार राज्य प्रसिद्धीप्रमुख गजानन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी वासवी कन्यका परमेश्वरी हभप ब्राह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शहीद झालेल्या जवानांना व महासभेतील मयत झालेल्या समाज बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती व महा सभेची ध्येयधोरणे तसेच संस्थेच्या नियमावली प्रमाणेच महासभेने काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे महासभेचे महासचिव गोविंदराव बिडवई यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून सांगितले आहे.

या सर्वसाधारण सभेत फेब्रुवारी महिन्यात अयोध्या येथे चौथे महासभेचे अधिवेशन आयोजन करण्यात आल्याची घोषणा करण्यात येऊन अयोध्येतील अधिवेशनाच्या पुर्व नियोजनासाठी एक टिम तयार करण्यात आली आहे. सर्व नवीन सभासदांना मान्यता देण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील 75 वर्षे पुर्ण केलेल्या समाज बांधव, भगिनींचा जिल्हास्तरावर कार्यक्रम घेऊन सत्कार करण्याचा ठराव पारित करण्यात आला, वासवी माता चॅरिटेबल हाॅस्पीटलची आरोग्य सेवा प्रभावी करणार, लातुर व देगलुर येथील समाज बांधवांनी दिलेल्या जागेवर मंगल कार्यालय, वासवी मंदिर उभारण्यात येणार, महासभेचा वार्षिक ताळेबंद सादर करण्यात आला, शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी योजना रथाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, महासभेच्या आजपर्यंतच्या कार्याचा लेखाजोखा पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येणार आहे, जीवन गौरव पुरस्कार तीन वर्षांतुन एकदा देण्यात येण्याची घोषणा करण्यात आली, यापुढे महासभेचे अधिवेशन दर तीन वर्षांनी होणार आहे, महिला महासभेच्या कोषाध्यक्षा म्हणून परभणी येथील डॉ अर्चना ढमढेरे यांची निवड करण्यात आली. यासह महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी घोषित केलेल्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात येऊन सर्व विषय पारित करण्यात आले. सर्व उपस्थित सदस्यांनी हात वर करून सर्व विषयांना सर्वानुमते मान्यता दिली.

याप्रसंगी रमाकांत रायेवार, संजय कौलवार, गजानन चीद्रेवार.बाळासाहेब कौलवार, सचिन गुंडेवार, बालाजी डुबेवार, गिरीष गुंडेवार, अनिल मुगटकर, प्रणव मनूरवार, विपीन गादेवार, प्रदिप मनाठकर, सतीश मेडेवार, विठ्ठल पाटील, बालाजी कोटुरवार.सुधीर गादेवार, प्रल्हाद काशेटवार, महेश पत्तेवार, चंद्रकांत गुंडाळे, प्रभाकर पत्तेवार, विजय कुंचनवार, संजीव कोंडेकर,विजय बंडेवार, नरेंद्र येरावार, दत्तात्रय चौधरी, विलास कोडगिरे,नरेश निल्लावार प्रितेश देवशेटवार आदींसह महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे राज्य, जिल्हा, तालुका व अजीवन सभासदांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

Share This Article
error: Content is protected !!