नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव – “हुंडाबंदी तसेच पैशांची उधळपट्टी थांबवण्यासाठी सकल मराठा समाज बांधवासह सर्व समाज बांधवांनी एकवटला पाहिजे आहे.
” सदरची पुणे येथील वैष्णवी हगवणे सह महाराष्ट्रातील अनेक माता-भगिनींचे घटना पाहता आणि ऐकता हृदय हलवून देणारी बातमी ऐकून अत्यंत भारावून गेलो होते, तरी सकल मराठा समाजाने उचललेल्या धाडसी पावलामध्ये दडलेल्या स्त्री मुक्ती चे उज्ज्वल भविष्य आपणास दिसत आहे.
म्हणून गाव तिथे एक तिथी सामूहिक विवाह हेच आपल्या सर्वांची तिथी समजून ही संकल्पना आपल्या सर्वांनी काळजीपूर्वक राबवायची आहे म्हणून साधारणतः दोनशे कुटुंबाच्या एका गावात वर्षाकाठी दहा- बारा लग्न पार पडतात. म्हणजे दहा वेळा गाव जेवण होणार, दहा वेळा मंडप टाकणार, दहा दिवस काम बुडणार. त्याच त्या पाहुण्यांना आपल्या गावात दहा वेळा यावं लागणार आणि आपणास ही दहा वेळा ही सर्व व्यवस्था उभी करावी लागणार. तर लग्न झालेल्या प्रत्येक नव दांपत्याला पुढच्या वीस- बावीस वर्षात किमान दोन लग्न करावे लागणार आणि प्रत्येक लग्नाला हुंडा वगळता किमान 5 लाख रुपये खर्च होणार. चला तर मग एक काम करूया, आपल्या गावात दिवाळीच्या आसपास ग्रामसभा घेऊन पुढील लग्न तिथी जाहीर करु. गावात ज्यांची लेकरं लग्नाची आहेत अशा प्रत्येक कुटुंबाकडून तीन हजार रुपये पट्टी घेऊ. म्हणजे सहा लाख रुपये जमा होतील. गरजेप्रमाणे कमी अधिक पट्टी घेता येईल. या पैशातून सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन होईल. म्हणजे एक पालक आपल्या वीस-बावीस वर्षांमध्ये 60 -70 हजार रुपये हळूहळू देत जाईल व त्याच्या आयुष्यातील लग्न खर्चाच्या समस्येतून तो मुक्त होईल.
दुसरी बाजू म्हणजे आपल्या मुलीचे लग्न असो किंवा नसो त्याला तीन हजार रुपये द्यावेच लागणार असल्यामुळे लग्न झाल्यानंतर मुलीच्या आयुष्यात काही अडचणी आल्या, तर बाप घाबरणार नाही. पुढच्या वर्षीच्या सामूहिक विवाह मेळाव्यात आपल्या मुलीचं अजून एकदा लग्न लावून देऊ शकेल. गरज पडल्यास बाप बॅन्ड लाऊन मुलगी घरी आणेल. मुलीच्या लग्न खर्चापाई, हुंड्यापाई, बाप नागवला जाणार नाही, शेती विकणार नाही, आर्थिक दिवाळखोरी येणार नाही, कर्ज होणार नाही, बाप खंबीर राहिल. लग्नाच्या खर्चाचा प्रश्न मिटल्यामुळे बाप मुलीच शिक्षण व रोजगार यावर लक्ष देईल. परिणामी मुलगी पायावर उभी राहिल, सक्षम होईल एवढेच नाही तर यातून खऱ्या अर्थाने स्त्री मुक्तीचा मार्ग प्रशस्त होईल. आलेल्या परिस्थितीला ती मुलगी घाबरणार नाही, झुकणार नाही, बाप खंबीर असल्याने मुलगी आत्महत्या नाही, सामना करील. मुलीचा बाप दडपणाखाली येणार नाही, आता खऱ्या अर्थाने दडपण येईल मुलांवर व मुलांच्या आई वडिलांवर. नवरा किंवा परिवार निट नाही वागला तर बायको नांदणार नाही. दुसरी मिळायचा तर प्रश्नच नाही.
एक गाव एक तिथी या संकल्पनेत काही अडचणी येऊ शकतात. उदा. गावातील प्रत्येक जण यात सहभागी होईल का? आपल्या गावातील ठरलेल्या लग्न तिथी नंतर सोयरीक जुळाली तर त्यांनी काय करायचं? किंवा आपल्या गावात ठरलेल्या तिथीच्या आधीच काही अडचणींमुळे लग्न करावे लागणार असेल तर काय करायचं? जो या अभियानात सहभागी होणार नाही त्याला आपल्या मुली- मुलांच लग्न स्वखर्चाने करावं लागेल, अर्थात त्याच्या एकट्या वर मोठा आर्थिक भुर्दंड पडेल. शिवाय समूहातून एकटा पडेल याची भीती असेल. म्हणून प्रत्येकजण आपोआपच सहभागी होईल.
एक गाव एक तिथी ही लोक चळवळ होईल व आपल्या शेजारच्या सर्वच गावांमध्ये अशा प्रकारची लग्न समारंभ होत जातील. शेजारच्या गावातील काही लग्न आपल्या गावात आली तर त्यांच्या कडून एकही पैसा आपण घ्यायचा नाही आणि आपल्या गावातील काही लग्न आजूबाजूच्या गावात गेली तर ते सुद्धा आपल्याला पैसे मागणार नाहीत. पंचक्रोशीतील सर्व गावांमध्ये मागेपुढे लग्न तिथी घेतलेल्या असल्यामुळे प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या गावात लग्न होतच राहतील. काहीच अडचण येणार नाही. हि चळवळ खऱ्या अर्थाने बळी पडलेल्या
अनेक वैष्णवी हगवणे सह महाराष्ट्रातील अशा परिस्थितीला झुंज देऊन आपलं जीवन यात्रा संपवल्या अशा सर्व महिलांना श्रद्धांजली🥲
आहेत त्या अनंत वैष्णवीं साठी, तिच्या मुलाबाळांना साठी जिवनदायी ठरेल. चला तर मग मित्रांनो, एक गाव एक तिथी या अभियानात सहभागी होऊया आणि मानवाच्या दुःखाच्या मुक्ती चा नवा अध्याय लिहुया!
अशी संकल्पना घेऊन नायगाव तालुक्यासह नायगाव मतदारसंघांमध्ये सकल मराठा समाज बांधवांसह सर्व समाज बांधवांनी एक गाव एक तिथी सामूहिक विवाह हीच आपली नाती ही संकल्पना घेऊन आपण सर्वांनी निघूया अशी विनंती तथा आव्हान गजानन पाटील चव्हाण यांच्या वतीने करण्यात येते आहे