राजकीय व्रदहस्त असलेल्या सट्टेबाजानवरप्रशासन मेहरबान?
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यात व लगतच्या तेलगाणा राज्यतील काही जिल्यात तरुणपिडीला अल्पवधीत श्रीमंत होण्याच्या भूल थापा देणाऱ्या aro 24 आणि Lotus 365 या सह इतर ऑनलाईन लिंक च्या माध्यमातून प्रत्येक क्रिकेट मॅच वर युवकांना सट्टेबाजी करण्यासाठी चे सिंडिकेट सांभाळणाऱ्या आयपीएल सट्टेबाजीचा धर्माबाद मधील मास्टर सचिन वर दिनांक 3 एप्रिल रोजी निजामबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यावेळी एकच खळबळ उडाली उशीर झाला पण न्याय होईल असे वाटत होते पण आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे सामने व स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली पण सट्टेबाजीच्या खेळातील मास्टर सचिन सह सुपर मास्टर आणि त्यांचे सिंडिकेट यावर कडक कारवाई करण्यात प्रशासन मात्र अपयशी ठरले असल्याने जनतेत कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मास्टर सचिन सह त्याचा सुपर मास्टर आणि त्यांचे पंटर असे मिळून या सट्टेबाजांनी हजारो युवकांना या खेळाची लिंक देऊन कोट्यवधी रुपयांचा प्रॉफिट कमवले सगळ्यात महत्वाचे म्हणजे यातील बहुतांश आर्थिक व्यवहार फोन पे,गुगल पे,युपीआय आणि क्यू आर कोड मधूनच झाले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड,बँक पासबुक आणि सट्टेबाज मंडळीचे मोबाईल जप्त केले होते.पण गोपनीय माहिती नुसार काही महिलांच्या नावे बँक खाते काडून त्यांच्या खात्यावर पश्याचे देवाण घेवाण चालू आहेत बॅंकेत खरा तपास केल्यास सर्व काही कळेलच पण तसें प्रशासनाला करायचे नाही.
मास्टर सचिन सह आणखी किती जणांचा सहभाग होता व त्यांनी किती युवकांकडून दररोज मोठ्या रक्कमा ऑनलाईन घेतल्या हे तपासात उघडकीस येईल आणि मागील एक दशकापासून या वाईट मार्गात किती जणांचे बळी गेले तसेच किती कुटूंब उध्वस्त झाले याचा न्याय होईल असे वाटत होते.
पण आयपीएल स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली तरीही सट्टेबाजी करणाऱ्यांचे प्रकरण पुढे सरकत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचा या प्रकारावरून प्रशासना प्रति विश्वास कमी होत आहे. किरकोळ प्रकरणात गुन्हा दाखल होताच आरोपीचे प्रेस नोट मध्ये पूर्ण नाव एकूण मुद्देमाल आणि सह आरोपी बद्दलची माहिती दिली जाते.
या प्रकरणात मात्र मास्टर सचिन एवढाच उल्लेख करण्यात आला सुपर मास्टर बद्दल व इतर पंटर बद्दल का गोपनीयता बाळगण्यात आली हे सर्वांना कोड्यात टाकणारे ठरले आहे. सर्वसामान्य नागरिकांना आजही कायद्याबद्दल विश्वास आहे उशिरा का होईना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
प्रशासनाने सट्टेबाजी करणाऱ्यांचे सिंडिकेट कायमस्वरूपी बंद करण्यासाठी त्यांचे बँक खात्यात झालेले व्यवहार व इतर स्थावर प्रॉपर्टी याची क्रॉस चेकिंग केली तर युवकांना बरबाद करणाऱ्यांना आदल घडेल आणि सर्वसामान्यांचा प्रशासनाबद्दल विश्वास टिकून राहील.अशी प्रांजळ अपेक्षा अनेकजण खाजगीत बोलतांना व्यक्त करत आहेत.