हिमायतनगर शहर प्रतिनिधी/लक्ष्मण भैरेवाड
हिमायतनगर : तालुक्यातील क्रीडा स्पर्धा सत्र 2023 व 24 चे भव्य आयोजन दिनांक 28- 8 -2023 पासून सुरू होत असून या क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्यातील युवक युती यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून तालुक्यातील जिल्हा परिषद व निम शासकीय संस्था यातील आणि इंग्लिश स्कूल मिडीयम च्या विद्यार्थ्यांनी देखील यात सहभाग नोंदला असून या भव्य कबड्डी स्पर्धेची सुरुवात होणार आहे. सदर कबड्डी स्पर्धेमध्ये 200 ते 250 हून अधिक विद्यार्थी यात सहभाग होत असून हा भव्य स्पर्धा कार्यक्रम गुरुकुल इंग्लिश स्कूल बोरगडी रोड हिमायतनगर येथे आयोजित केला असून सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार माननीय श्री शेंडे साहेब, व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी शिवानंद शिवाचार्य साहेब, यांच्या शुभहस्ते होत असून सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सूर्यवंशी सर, अंगुलवार सर कापसे सर दिक्कतवार सर नवसागरे सर मनोहर राठोड उपस्थित राहणार असून तालुका क्रीडा स्पर्धेचे संयोजक के बी शेंनेवाड यांनी सदर कार्यक्रमाची माहिती दिली आहे. तर या कबड्डी भव्य स्पर्धेसाठी पंच म्हणून तामसेटवार मॅडम, पी के चव्हाण सर, भावडे सर पवार सर असणार आहेत. तर सदरील कार्यक्रमाचे आयोजक तथा संयोजक तालुका क्रीडा समिती, के बी शेंनेवाड आहेत.
हिमायतनगर तालुका क्रीडा स्पर्धा सत्र 2023 -24 भव्य आयोजन..