गोंडस बाळाचा जन्म,सिझरनंतर अतिरक्तस्त्राव अन् दुसऱ्याच दिवशी आईचा मृत्यू,नांदेड हळहळ

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड जिल्यातील लोहा तालुक्यात मधील उमरा तांडा येथील एका महिलेची प्रसूती झाली.तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.मात्र,प्रसूतीनंतर तिला अतिरक्तस्त्राव झाला.त्यामुळे तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.मात्र, तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली.घरात नवीन पाहुण्याचं आगमन होणार होतं.विवाहितेने कन्येला जन्म दिला.घरात लक्ष्मीचं आगमन झाल्याने कुटुंबियांमध्ये आनंद द्विगुणित झाला,पण त्यांचा हा आनंद क्षणीकच ठरला.प्रसूती दरम्यान,रक्तस्त्राव झाल्याने विवाहितेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.जन्म दिलेल्या बाळाला आपल्या आईलाही पाहता आले नाही.एका क्षणात आईविना बाळ पोरके झाले.मनाला चटका लावणारीही घटना सोमवारी (2 जून) सकाळी नांदेड शहरातील एका खासगी रुग्णालयात घडली.डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

 आरती रतन राठोड अस मयत विवाहितेचे नाव आहे. मयत आरती (वय 20) ही लोहा तालुक्यातील उमरा तांडायेथील रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी तिचा गावातील रतन राठोड या तरुणाशी विवाह झाला होता. दोन्ही कुटुंबियांची अंत्यत गरीब परिस्थिती होती.लग्नानंतर आरती ही तिचा पती रतनसोबत कधी शेतात तर कधी ऊसतोडणीला जात होती. 1 जून रोजी प्रसूतीसाठी आरती यांना नांदेड शहरतील माणिकनगर येथील फोर्टीज स्टार व नर्सिंग होम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.त्यांचे सिजेरियन करण्यात आले.

 यावेळी आरती यांनी गोंडस मुलीला जन्म दिला.दरम्यान, प्रसूतीनंतर आरती यांना रक्तस्तत्राव अधिक झाल्याने त्यांची प्रकृती खालावली.

डॉक्टरांनी तात्काळ तिला छत्रपती चौकातील तिरूमला हॉस्पिटलमध्ये हलवले.तिथे दहा ते पंधरा रक्ताच्या पिशव्या चढवण्यात आल्या.दुर्देवाने सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास आरतीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान,एक दिवसाच्या चिमुकलीची मायेची छाया हरवली. जन्म दिलेल्या मुलीला न पाहताच आरतीने या जगाचा निरोप घेतला.या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

Share This Article
error: Content is protected !!