अन्नत्याग उपोषण म्हणजे संघर्षाची नांदी परिवर्तनाची गवाई गजानन पाटील चव्हाण यांनी बसणार बच्चु कडू सोबत अन त्या उपोषणाला….

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे 

नायगाव – शेतकरी निराधार दिव्यांग कामगार सह यांच्या न्याय हक्कासाठी बच्चुभाऊ कडू यांच्या अन्न त्याग उपोषणाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

दिनांक 08/06/2025 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी जवळ गुरुकुंज मोझरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथे अन्नत्याग आमरण उपोषण प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांक्रांती संघटना राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अन्नत्याग उपोषण हे जन आंदोलन आहे शेतकरी दिव्यांग निराधार कामगार बेघर वाहनचालक ग्रामपंचायत कर्मचारी मेंढीपाल मच्छिमार मूकबधिर सह उपेक्षितांच्या न्यायासाठीचां निर्णायक लढा आहे 

आज राज्यातील लाखो शेतकरी कर्जाच्या ओझाखाली दबले आहेत शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे त्यांचे उत्पन्न शून्याच्या आसपास पोचलेले आहे दिव्यांग बांधवांना आणि निराधार माता भगिनींना व ज्येष्ठ बांधवांना आजही फक्त फक्त पंधराशे रुपये पेन्शनवर जगाव लागते हे अत्यंत अन्यायकारक आहे.

तसेच शेतमालाला हमीभाव शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांग बांधवांना प्रतिमा सहा हजार पेन्शन मिळून देण्यासाठी लढा देणारी आहे महाराष्ट्रभर होणाऱ्या या अन्नत्याग उपोषणातून आपण सरकारला जागे करणार असून शेतकरी व दिव्यांग यांचे हक्क मिळवण्यासाठी निर्णायक आवाज उठवणार आहोत महाराष्ट्रातील जनतेचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे 

अन्नत्याग उपोषण म्हणजे संघर्षाची नांदी परिवर्तनाची गवाई आणि न्यायासाठीची सच्ची हाक आहे या सच्ची हाक मध्ये सरसकट शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणे व संकल्पानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव व 20 टक्के अनुदान देण्यात यावे तसेच तेलंगणाच्या धर्तीवर एकेरी दहा हजार रुपये मदत किंवा भावाचा चढउतार निधी देण्यात यावा

विधवा निराधार दिव्यांग ज्येष्ठ बांधवांसाठी दर महिना 6000 रुपये मिळावेत 

शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल लाभधारकांना समान निकष लावून किमान पाच लाख रुपये रुपये FRP एफआरपी दर मिळावेत तसेच प्रत्येक शेतकऱ्यांना काटा करून रिकवरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी व 15 दिवसांमध्ये पैसे दिले नाही तर व्याजासह पैसे वसूल व्हावे किंवा पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात यावे यासह महाराष्ट्रातील सर्वसामान्य आणि शेतकरी बांधवासह विविध मागण्याचे उपोषण माननीय श्री राज्यमंत्री बच्चुभाऊ कुडू साहेब यांच्या नेतृत्वामध्ये उपोषण होत आहे मोठ्या संख्येने आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे उपोषण कर्ते आवाहन गजानन पाटील चव्हाण यांनी करत आहेत

Share This Article
error: Content is protected !!