नांदेड जिल्हा प्रतिनिधी-
नांदेड : भोकर मतदारसंघाच्या माजी आमदार आदरणीय अमिता भाभीजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा व तालुका शहर पद व नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले व बुथ निहाय बांधणी,संवादयात्रा व महिलांचे संघटन वाढवणे या विषयावर चर्चा झाली व येत्या काही दिवसात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांना समोर जाण्यासाठी तयार रहा असा संदेश महिलांना अमिताजी भाभी चव्हाण यांनी दिल्या
भोकर मतदारसंघाच्या माजी आमदार व कार्यक्रमाच्या अध्यक्षा अमिता भाभीजी चव्हाण,मार्गदर्शिका माजी महापौर मंगलाताई निमकर, उमलता युवती नेत्रुत्व तथा श्रीजया ताई चव्हाण,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी ताई आंबुलगेकर,या कार्यक्रमाचे नियोजक,ग्रामीण जिल्हाध्यक्षा कविता ताई कळसकर, माजी महापौर जयश्रीताई पावडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा रेखा ताई पाटील चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनिता ताई इंगोले, सरचिटणीस सुमतीताई व्याहाळकर, सचिव मीनाक्षीताई कागडे,मंगलाताई धुळेकर,सर्व जिल्हा उपाध्यक्षा, पदाधिकारी,ब्लॉक अध्यक्षा, तालुकाध्यक्षा व शहर पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या