भारतीय जवान साईनाथ उपासे यांचा जन्म भुमी पळसगाव येथे सन्मान….! 

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नायगाव  प्रतिनिधी /अशोक वाघमारे

नायगाव –  उडीसा येथील इंडियन आर्मीचे प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या पळसगाव या जन्मभूमीत परत आलेल्या भारतीय जवान श्री साईनाथ गुलाबराव पाटील उपासे या सैनिकाचा सन्मान अनेक मान्यवरांसह अनेक व्यक्तीने करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

   नायगाव तालुक्यातील मौजे पळसगाव येथे आपल्या गावातील भूमिपुत्र साईनाथ उपासे यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेल्या प्रसंगी विचार पिठावर श्री संत बालयोगी गंगाबन गुरु मंगलबन महाराज यासह जि.प.चे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर,कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव येथील माजी सभापती श्रीनिवास पाटील चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बालाजी बचेवार,माजी सैनिक तुपदाळे,संभाजी कांबळे, यलप्पा शिरोळे, ताकबीड येथील माजी सरपंच शिवराज पाटील वरवटे,अंतरगाव येथील माजी सरपंच संभाजी पाटील,गंगनबीड येथील माजी सरपंच गंगाधर पाटील मोरे,पळसगाव येथील सरपंच सौ. यशोदाबाई साहेबराव कांबळे, टाकळगावचे चेअरमन मदनराव पा ताटे यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय जवान शैनात उपासे यांचे गावात आगमन झाल्यानंतर समस्त गावकऱ्यांनी गावभर त्यांची भव्य रॅली काढून जंगी स्वागत करून फटाक्याची अतिश बाजी केली तर अनेक आयाभगीनीनी त्यांना औक्षण केले,भारत माता की जय वंदे मातरम घोषणा सर्वत्र दुमदुमली, प्रारंभी प्रस्ताविक पर माजी सरपंच शिवाजी पाटील शिंदे यांनी आपली भूमिका मांडली कार्यक्रमांचे सूत्रसंचलन पत्रकार माधव बैलकवाड यांनी तर आभार पोलीस पाटील संतोष सूर्यवंशी यांनी मानले.

    यावेळी उपसरपंच दत्ता पाटील शिंदे,तंटामुक्ती अध्यक्ष कडाजी पाटील शिंदे,चेअरमन दशरथ पाटील उपासे, बाबुराव पाटील उपासे व माधवराव पाटील उपासे रामकिसन उपासे, गुलाबराव उपासे, माधव उपासे, नामदेव उपासे यासह गावातील महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Share This Article
error: Content is protected !!