मुंबई आझाद मैदानावर महाएल्गार आंदोलन; नियोजन आढावा बैठकीचे नांदेड येथे भव्य आयोजन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ राहुल कोलते 

नांदेड – अनुसूचीत जातीच्या आरक्षण लाभापासुन अनेक जात समूह वंचित आहेत.लाभ वंचित जातीच्या सर्वांगीण विकासासाठी आरक्षण उपवर्गीकरण करण्यात यावे, असा ऐतिहासीक निकाल देशाच्या मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.१ऑगस्ट २०२४ रोजी दिला आहे.

      मात्र महाराष्ट्र शासन स्तरावर आरक्षण वर्गीकरण करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे दिं.१० जुलै २०२५.रोज सोमवारी दुपारी १:०० वा.स्थळ :- आझाद मैदान मुंबई आरक्षणाचे उपवर्गीकरण विधेयक मंजुर झालेच पाहिजे.या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनाचे वतीने लोकस्वराज्य आंदोलन प्रा.रामचंद्रजी भरांडे  यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आझाद मैदानावर महाएल्गार आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. त्या संदर्भात जिल्हातुन जास्तीत जास्त समाज बांधव नेण्यासाठी गाव पातळीवर बैठकीचे नियोजन करण्यासाठी येत्या दिं.१७ जून २०२५ रोज मंगळवारी दुपारी १२:३० वा. नांदेड शासकीय व्हीआयपी विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा व नियोजन बैठकीचे आयोजन केले आहे.अशी माहिती लोकस्वराज्य आंदोलनाचे नांदेड जिल्हाध्यक्ष अंकुशदादा गायकवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आणि सुनील जाधव,कृष्णकांत गायकवाड,गोविंद रेडे,माधव गायकवाड,शिवाजी वाघमारे आदींनी या बैठकीला युवक,युवती,विद्यार्थी विद्यार्थिनी,समाज बांधव,कर्मचारी वर्ग,लहु सैनिकांनी आवर्जून उपस्थित रहावे,असे आवाहन केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!