वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून नांदेडकरांचे एक स्वप्न प्रत्यक्षात आणले -खा. अशोकराव चव्हाण यांची माहीती

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रतिनिधी /हरजिंदर सिंघ संधू 

नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून नांदेडकरांचे एक स्वप्न प्रत्यक्षात आणल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंह बिट्टू यांचे मनापासून आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ११ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीच्या निमित्ताने ही नांदेडकरांसाठी एक विशेष भेट म्हणता येईल.

नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेससाठी माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांचे मी विशेष आभार मानतो. ही गाडी सुरु करण्याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच द्यावे लागेल. त्यांनीच २०२३ मध्ये नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची घोषणा केली होती. त्यांच्या मंत्रीपदाच्या काळातच ही गाडी मुंबईहून जालनापर्यंत सुरू झाली. जालना ते नांदेड दरम्यानच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर ही गाडी नांदेडपर्यंत धावणार असल्याचे पूर्वनियोजित होते. त्यानुसार, रेल्वे बोर्डाने नांदेड-मुंबई-नांदेड प्रवासाचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. मी रावसाहेबजी दानवे यांचे मनापासून अभिनंदन करतो

Share This Article
error: Content is protected !!