प्रतिनिधी/ जरगेवाड बाबाराव
नांदेड – नायगाव तालुक्यातील बरबडा येथील माजी सरपंच कै.आईनवाड याचे पुत्र मंगेश नाईनवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
मंगेश आईनवाड यांनी आपले सर्वस्व पणाला लावून आज पर्यंत पक्ष वाढीसाठी कार्य केले आहे.ते जिल्ह्यातील यूककांचे आयकाँन म्हणून ओळखले जातात.त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून पक्ष वाढीसाठी कार्य केले आहे.ते गोल्ला गोलेवार समाज बांधव असून त्यांनी आपल्या वडीलांच्या पावलांवर पाऊल ठेवून सामाजिक कार्याचा वसा घेतला आहे.
त्यांची ही निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
मंगेश आईनवाड यांना निवडीचे पत्र माजी खासदार, विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हा अध्यक्ष दिलीप राव धर्माधिकारी बरबडेकर जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे,मंगेश नाईनवाड यांच्या सोबत दत्ता बकेवाड ,स़जय नेरलेवाड, बालाजी जकीलवाड, यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
या निवडीनंतर मंगेश यांनी जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी पूर्ण वेळ काम करणार असल्याचे आमच्या प्रतीनिधीशी बोलले आहेत.