नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करावा – गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटील

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नायगाव  प्रतिनिधी /अशोक वाघमारे

नांदेड – 2025-2026 या नविन शैक्षणिक वर्षाची सुरवात करतांना शाळेच्या पहिल्या दिवशी “शाळा प्रवेशोत्सव” विविध सहशालेय उपक्रम राबवून अत्यंत उत्साहाने साजरा करावा असे आवाहन पंचायत समिती नायगावचे गटशिक्षणाधिकारी श्री सुरेश पाटील यांनी केले.

ते “शाळा प्रवेशोत्सव” उपक्रमाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या नायगाव तालुक्यातील मुख्याध्यापकाच्या तालुकास्तरीय बैठकीमध्ये बोलत होते.

माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड व माननीय शिक्षण अधिकारी (प्राथमिक )जि.प.नांदेड यांनी यावर्षीचा “शाळा प्रवेशोत्सव” अत्यंत उत्साहाने व विविध उपक्रमाने साजरा करणेबाबत सुचित केले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी जिल्ह्यातील मा.लोकप्रतिनिधी व विविध स्तरावरील अधिकारी हे शाळा प्रवेशोत्सवाचे दिवशी शाळांना भेटी देऊन या शाळा प्रवेशोत्वामध्ये सहभागी होणार आहेत.

 त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यासह येणाऱ्या मान्यवरांचाही सहभाग असणार आहे.त्यामुळे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी,पालक,शिक्षक यासह गावातील सर्व ग्रामस्थांसाठीही संस्मरणीय व्हावा व गावामध्ये शैक्षणिकदृष्ट्या निकोप वातावरण तयार व्हावं यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ व शिक्षणाची आवड असणाऱ्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळेवर “शाळा प्रवेशोत्सव” अत्यंत आनंदाने व उत्साहाने साजरा करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण विस्तारअधिकारी श्री विठ्ठल सूर्यवंशी,श्री पंडितराव ढगे,लेखा विभागाचे श्री कांबळे,शापोआचे श्री अभंगे,जि.प.हायस्कूलचे मुख्याद्यापक रेणुगुंटवार सर,श्री बिंगेवार सर,श्री बोरगावे सर,श्री टिकाने सर,केंद्रप्रमुख श्री डोमशेर सर,श्री नलबलवार सर,श्री मंगेश हनवटे सर,श्री शिवराज साधू सर व कपिल गारठे सर,पंचायत समितीचे सर्व विषयतज्ञ तसेच सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची उपस्थिती होती.

Share This Article
error: Content is protected !!