गुत्तेदार झाले मालामाल गावकऱ्यांचे बे हाल
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यातील मुदखेड तालुक्या मधील मौजे चिलपिंपरी येथे जिल्हा परिषद अंतर्गत चिलपिंपरी ते टाकळी पाटी या रस्त्याचे डांबरीकरण चालू असून. रस्त्याच्या दोन्ही साईटच्या काटेरी झुडूपे न तोडताच रोड मध्ये आलेले झाडे सुद्धा न काढताच नाली न काढताच कामाला सुरू केले आहे गावकऱ्यांनी त्यांना दोन्ही साईडच्या नाला काढून दोन्ही साईटच्या झाडे झुडपे तोडून नंतर कामाला सुरुवात करा असे सांगले असता आम्हाला तुम्ही काही सांगू नका कसं काम करायचं ते आम्हाला माहिती आहे आम्ही काम असेच करू कोणाला सांगायचं ते जाऊन सांगा असे बोलत आहेत.
काम चालू असताना साईडने दुसरे वाहन गेले असता रस्ता आत्ताच उकळत आहे.हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता जिथे कुठे रस्ता उकळत असेल त्याचे पुन्हा काम करू असे बोलत आहेत.पण होत असलेलेच काम व्यवस्थित करत नाहीत याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे.डांबरीकरण रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे असे आमदार श्रीजया चव्हाण आणि BDO देशमुख साहेबांना भ्रमणध्वनी करून पत्रकार राहुल कोलते यांनी सांगितले ग्रामपंचायत अंतर्गत नाली आणि सीसी रस्त्याचे काम चालू असून ते निकृष्ट दर्जाचे होत आहे गावकऱ्यांनी वारंवार सांगून सुद्धा गुत्तेदारांना काही फरक पडत नाही रस्त्याची आणि नाल्यांची काम दोन महिन्यापासून रखडलेले आहे. उन्हाळ्यात काम सुरु करून सुद्धा अजुन काम पूर्ण झालेले नाही. अर्धवट झालेल्या कामा मुळे लोकांना ये जा करतांना त्याचा खुप त्रास होत आहे.
गावकऱ्यांची एकच विनंती आहे की शासनाने याकडे लक्ष देऊन अर्धवट राहिलेलं काम पूर्ण का झाले नाही याची विचारणा करावी आणि राहिलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सांगावे.नाल्याचे आणि रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून यांचे सुद्धा चौकशी करावी नाली चे काम चालू असतानाच नाल्या उललेल्या दिसत आहेत.अनेक ठिकाणी ठिकाणी नाल्या अर्धवट सोडून तिथेच काम थांबवलं आहे. हे काम पूर्ण का झाला नाही यांची सुद्धा शासनाने चौकशी करावी. पावसाळ्यापूर्वी जर काम नाही झाले तर येणाऱ्या पावसाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात पाणी जाण्याची जास्त भीती आहे.
चिलपिंपरी गावामध्ये विकास कामासाठी शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला जातो.पण एकही काम नीट होत नसून शासनाच्या निधीचा मोठा फायदा गुत्तेदारांना मात्र नक्कीच होत आहे असे गावकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.