इंजिनिअर.शमित कृष्णुरकर (कागडे) यांची अमेरिकेतील नामांकित युनिव्हर्सिटीत (एम.एस.)रिसर्च साठी निवड ….!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नायगाव  प्रतिनिधी/अशोक वाघमारे 

नायगाव इंजि.शमित कृष्णुरकर यांचे दहावीपर्यंत चे शिक्षण व्होरायजन इंग्लिश स्कूल विष्णुपुरी नांदेड येथे झाले. 86.0% मार्क घेऊन घवघवीत यश संपादन केले. पुढील बारावी पर्यंत चे शिक्षण भारतात प्रसिद्ध असलेल्या राजस्थान कोटा ऐलन जेईई क्लासमध्ये प्रवेश मिळवला व बारावीत 82.0 % मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केले. ऑल होअर इंडिया जेईई मेन्स परिक्षेत भारतात 2000 वा रँक आला व भारतात 8 व्या क्रमांकावर असलेल्या शासकीय एन आय टि काॅलेज तिरुचिल्लापली, तमिळनाडू येथे पदवीचे शिक्षण प्रथम क्रमांकात पुर्ण केले.जवळपास 8.5 सीजीपीए मिळवला.तामिळनाडू येथे बी.टेक.पदवीचे अंतिम सेमिस्टर सुरु असतानाच विदेशात शिक्षण घेण्याची पात्रता परिक्षा जिआरई आणि टोफेल परिक्षा 95.0 %मार्क घेऊन उत्तम यश संपादन केले.अमेरिकेतील एरिझोना, ओहीवो,शिकागो व व्हर्जिनीया विद्यापीठाने इंजिनिअर शमित कृष्णुरकर यांची निवड केली.पण अमेरिकेतील रिसर्चसाठी नामांकित,टाॅपवर असलेल्या व्हर्जिनिया विद्यापीठाची शमितनी निवड केली. उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी शमित कृष्णुरकर ऑगष्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.इंजिनियर शमित कृष्णुरकर(इलेक्ट्रिकल इंजिनिअर) हे माजी जिल्हा परिषद सदस्या डाॅ.मिनाक्षीताई डाॅ शिवाजी कृष्णुरकर (कागडे) यांचे चिरंजीव आहे.

Share This Article
error: Content is protected !!