श्रीक्षेत्र माहूर ता.प्रतिनीधी/
माहूर :माहूर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सोलापूर तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी बजरंगसिंह रामसिंह हजारी यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माहूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील मोरे यांच्याकडून त्यांची स्वाक्षरी असलेले या संदर्भातील नियुक्ती पत्र नुकतेच पत्रकार हजारी यांना प्राप्त झाले आहे. या नियुक्ती बद्दल माहूर तालुक्यासह जिल्हाभरातील विविध माध्यमांचे संपादक महोदय, जिल्हा व तालुका प्रतिनिधी यासह सर्व स्तरांतून हजारी यांचेवर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे,प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे,अभयकुमार दांडगे, विभागीय अध्यक्ष अनिल सावंत यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा कार्यकारणीने, गेली वीस वर्षांपासून विविध अग्रगण्य वत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या धारदार लेखनीने सकारात्मक लिखाण करत वाचकांच्या मनात एक वेगळीच छाप निर्माण करण्यात यशस्वी झालेले माहूर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दै. तरुण भारतचे (मराठवाडा आवृत्ती) तालुका प्रतिनिधी बजरंगसिंह हजारी यांच्या वृत्तपत्र माध्यमातील प्रदीर्घ कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माहूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या संदर्भातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील मोरे यांनी आपल्या स्वाक्षरीने पाठविलेले नियुक्ती पत्र नुकतेच पत्रकार हजारी यांना प्राप्त झाले आहे. या निवडीबद्दल मराप संघाचे निवड समितीचे प्रदेशाध्यक्ष रुपेश पाडमुख, सरचिटणीस बापूसाहेब पाटील,
जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील मोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष लक्ष्मिकांत मुळे,
जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर काकडे, यांच्यासह अनेकांनी हजारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या असून, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ध्येय धोरणे आणि कार्य प्रामाणिकपणे आपल्या कार्यक्षेत्रात पार पाडत पत्रकार संघाचे नाव अधिक उज्वल कराल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माहूर तालुका अध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल प्रदेश पत्रकार संघ तथा जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व वरीष्ठ पदाधिकाऱ्यांचे हजारी यांनी आभार मानले असून, “त्यांनी दाखविलेल्या विश्वासाला किंचितही तडा जाऊ न देता अपेक्षेला खरा उतरीन!”, असा विश्वास नवनियुक्त तालुका अध्यक्ष बजरंगसिंह हजारी यांनी व्यक्त केला आहे. लवकरच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची माहूर तालुका कार्यकारिणी गठित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.