विद्युत खांबावरील तारा अंडरग्राउंड करून द्या ; नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांची राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

श्रीक्षेत्र माहूर ता.प्रतिनीधी/

माहूर – शहरातील विद्युत खांबावर विद्युत पुरवठा करण्यासाठी असलेल्या तारा केबल हया 60 ते 65 वर्षांपूर्वीचे तर खांबही त्याच काळातील असल्याने सर्व विद्युत खांब जंगले असून अनेक खांब रस्त्यातही आल्याने नागरिकासह येणाऱ्या भाविकांसोबत मोठा अपघात घडू शकतो त्यामुळे शहरातील सर्व विद्युत खांब आणि तारा काढून त्या अंडरग्राउंड जमिनीखालून करून देण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी माहूर येथे दर्शनासाठी आलेल्या मंत्री मेघना बोर्डीकर यांचे कडे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी निवेदनाद्वारे केली आहे

      माहूर शहरात तत्कालीन आमदार आबासाहेब पारवेकर यांनी 1967 मध्ये विद्युत खांबासह विद्युत प्रवाह आणून माहूर गावात रोषणाई केली होती त्यामुळे आजही त्यांचे नावाने आठवडीं बाजार परिसरातील प्रभागास आबासाहेब पारवेकर यांचे नाव दिलेले आहे तेव्हापासून आजपर्यंत वाढीव वस्त्यांमध्ये खांब आणि विद्युत तारा बसविण्यात आल्या परंतु जुन्या माहूर शहरातील हजारोच्या संख्येने असलेल्या खांबांना किंवा त्यावरील तारांना बदलण्यात आलेले नाही हवेमुळे किंवा झाड पडल्यामुळे अनेक ठिकाणी तारे तार तुटली त्या बदलण्यात आल्या परंतु खांब जसाश तसेच असून अनेक काम सडले असून ते कधीही पडू शकतात तर अनेक ठिकाणी चौकामध्ये विद्युत खांब मध्येच असल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा होतो तर राष्ट्रीय महामार्गाला जोडलेल्या गल्लीबोळात जाणाऱ्या रस्त्यावरही खांब रस्त्यात आले किंवा तारा लोंबकाळलेल्या असल्याने नागरिकासह भाविकांना धोका होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे

    अनेक वेळा शहरांमध्ये खांबासह टेन्शन तार मध्ये विद्युत प्रवाह उतरून अनेक नागरिकासह जनावरांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे शहरातील सर्व खांब आणि तारा हटवून सर्व तार आणि खांब जमिनीतून अंडरग्राउंड टाकून नागरिकांना विद्युत पुरवठा देत समस्या कायमची निफ्टवीण्यासाठी माहूरला निधी देऊन सर्व केबल अंडरग्राउंड करावे अशी मागणी मंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांनी निवेदनाद्वारे केली आहे

Share This Article
error: Content is protected !!