आसोली फाटा बंजारा तांडा वडसा रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे
श्रीक्षेत्र माहूर ता.प्रतिनीधी/
माहूर – तालुक्यात आमदार भीमराव केराम यांच्या निधीतून होत असलेल्या रस्त्यांच्या गुणवत्तेकडे बारकाईने लक्ष असून गुत्तेदारांनी हयगय काम पूर्ण करण्यासाठी उशीर लावल्यास त्यांना सोडणार नसल्याचे सांगून उपविभागीय अभियंता डी के भिसे हे स्वतः कनिष्ठ अभियंता आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जायमोक्यावर उभे राहून काम पूर्ण करून घेत असल्याने गणेश कंट्रक्शन कडून आसोली फाटा बंजारा तांडा ते वडसा पर्यंत सुरू असलेल्या डांबरीकरण कामाची त्यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले
माहूर तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग 161 ए ते अनेक खेड्या पाड्याला जोडणारे अंतर्गत रस्ते आमदार भीमराव केराम यांनी मुख्य रस्त्याशी जुळावे आणि दळणवळणाची सुचारू व्यवस्था होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावे यासाठी अनेक खेड्यापाड्यांना राष्ट्रीय महामार्गाची जोडण्यासाठी त्यांनी कोट्यावधी रुपयांचे रस्ते मंजूर केले आहेत त्या अंतर्गत अनेक रस्त्याची कामे पूर्ण झाली असून त्यासोबत रस्त्यावरील शेकडो पूलांची कामे पूर्ण झालेली आहे काही अपवादात्मक ठिकाणी रस्त्यावरील पूलांचे काम अंतिम टप्प्यात असून त्यामुळे नागरिकांची पावसाळ्यात गैरसोय होणार नाही यासाठी उपविभागीय अभियंता डी के भिसे हे स्वतः कर्मचाऱ्यांना घेऊन कामावर उभे राहत तात्काळ काम पूर्ण करून घेण्यासाठी आग्रही असून सोबतच गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागू नये म्हणून आपल्या देखरेखी खाली पूर्ण कामे पूर्ण करून घेत आहेत
आसोली फाटा बंजारा तांडा ते वडसा पर्यंत होत असलेल्या रस्त्यावर खोदकाम झाल्यानंतर चूरी आणि गीट्टी टाकून प्रेशर रोलर द्वारे दबाई करण्यात आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डांबरीकरणाचे थर टाकून दबाई करत रस्त्याचे सरळीकरण मजबुतीकरण करण्यात येऊन रस्ता गुणवत्तेच्या कसोटीत गणेश इंटरप्राईजेस च्या कंत्राटदारांनी खरा उतरविला आहे त्यामुळे आमदार भीमराव केराम यांच्या निधीतून होत असलेली कामे गुणवत्ता पूर्ण असल्याची खात्री झाल्यानंतरच देयके काढण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अभियंता डी के भिसे यांनी दिली असून कामाच्या गुणवत्तेबाबत हायगय आणि लेट लतीफ कामे करण्यात येत असलेल्या इतर कंत्राट दाराकडून चूक किंवा खराब कामे होतील त्यांच्याकडून ही कामे पूर्णपणे दुबार करून घेण्यात येतील असा कडक इशारा त्यांनी लांजी फाटा ते टाकळी रस्त्यावरील पुलाच्या कामाची पाहणी करत असताना दिला आहे