२० जून रोजी कामगार आयुक्तांसह,नोंदणी अधिकाऱ्यांना बोलावले कलेक्टर ऑफिस
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड दि.२०.अप्पर दंडाधिकारी महेश वडदकर यांनी सीटू कामगार संघटनेच्या मोर्चाची दखल घेतली असून २० जून रोजी सहाय्यक कामगार आयुक्त व सर्व सरकारी कामगार अधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीला बोलावण्यात आले आहे.
दि. १२ जून रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो कामगारांचा आक्रोश मोर्चा काढून नोंदणी अधिकारी यांची मनमानी थांबवावी व नूतनिकरण करावे तसेच सर्व नोंदीत बांधकाम व घरेलू कामगारांना भांडे संच व साहित्य किट देण्यात यावी ही मागणी करण्यात आली होती.
सदरील मोर्चाची दखल जिल्हाधिकारी व निवासी उप जिल्हाधिकारी यांनी घेतली असून दि.२० जून रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली आहे. तसे लेखी पत्र अप्पर जिल्हादंडाधिकारी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले असून सहाय्यक कामगार आयुक्त श्री अनिकेत थोरात यांच्या सह सर्व नोंदणी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डीले आणि निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या दालनात कामगार कार्यालयातील अनियमितता तसेच सोईस्कर पद्धतीने देण्यात आलेले अप्रोव्हल हे व इतर मुद्दे उपस्थित होणार असल्यामुळे कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांना सर्व तयारीनीसी बैठकीला जावे लागणार आहे. यापूर्वी सीटू कामगार संघटनेने अनेक मोर्चे आंदोलने केल्याचे व प्रश्न अद्याप न सुटल्याचे अनेक पुरावे संघटनेकडे उपलब्ध आहेत.