शहर व ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव यावर तात्काळ उपाय योजना करा-खा.रविंद्र चव्हाण
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड :दि.२०.आज जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन नांदेड येथें राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.श्री अतुलजी सावे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत जिल्ह्याचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी अवैध्यरित्या चालू असलेल्या नशेली गोळ्या (औषधाचा) सुळसुळाटामुळे विद्यार्थी,युवक मोठ्या प्रमाणात त्याच्या आहारी जात असल्यामुळे त्यांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. त्यामुळे तात्काळ त्यावर कारवाई करण्यात यावी व नांदेड शहर व जिल्ह्यातील विजेचा लपंडाव यावरही योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालकमंत्री यांच्याकडे केली.जिल्ह्यात सुरू असलेल्या व नियोजित विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला विविध योजनांचा लाभ अंतिम लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या.
या बैठकीस सन्माननीय खासदार श्री अशोकराव चव्हाण,आमदार श्री हेमंत पाटील,आ.आमदार प्रताप पाटील चिखलीकर.आ.श्री भीमराव केराम,आ.जितेश अंतापूरकर,आ.श्री बालाजी कल्याणकर, आ.श्री आनंद पाटील बोढरकर,आ.श्री राजेश पवार चिखलीकर,आ.श्री बाबुराव कदम तसेच शिक्षक आमदार श्री विक्रम काळे आ.श्रीजयताई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डीले,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली, पोलीस अधीक्षक श्री अभिनाश कुमार यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित तसेच विविध शासकीय अधिकारी, जनप्रतिनिधी,पत्रकार बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.