माहूर तालुक्यातील पार्डी येथील युवकावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल 

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

माहूर ता.प्रतिनिधी

माहूर तालुक्यातील पारडी येथील वीरेंद्र ठाकूर या युवकावर ॲट्रॉसिटी अंतर्गत तर अन्य चार जणांवर भारतीय न्यायसहीते च्या विविध कलामान्वे गुन्हा माहूर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे

 वानोळा तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील दीपक उर्फ सोनू नामदेव तोडसाम व पार्डी येथील गोलू फोटोग्राफर हे पुणे येथील खाजगी कंपनीत कामाला होते पंधराशे रुपये तीन दिवसाची मजुरी देण्या घेण्यावरून वाद होता. या वादावरून पार्डी गावातील वीरेंद्र ठाकूर व इतर चार जणांनी दीपक उर्फ सोनू यास कट रुजून जीवे मारण्याचा बेत आखला होता. सोनू तोडसामला फोन करून त्याचे लोकेशन घेण्यात येत होते. वीरेंद्र ठाकूर व इतर चार जण जुनापाणी चे घाटात दबा धरून बसल्याचे कळाले,सोनू तोडसामने मोटरसायकल वेगाने चालवून पळ काढला व जीव वाचविला आणि वानोळा येथील घरी पोहोचला. त्यानंतर वीरेंद्र ठाकूर यांनी सोनू तोडसाम यास फोनवरून जातीवाचक शिवीगाळ केली व जिथे दिसेल तिथे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा दिनांक 18 /6 /2025 रोजी माहूर पोलीस स्टेशनला रेकॉर्डिंग नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी रीतसर अर्ज दिला आणि ॲट्रॉसिटी व भारतीय न्याय संहिता नुसार विहित विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 यातील विरेंद्र ठाकूर यास अटक करून नांदेडच्या न्यायालयीन तुरुंगात रवाना करण्यात आले आहे तर बाकीचे चार जण फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे या धाडसी कारवाई बाबत कौतुक करण्यात येत आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामचंद्र मळगणे हे करीत असून त्यांना पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण हे सहकार्य करीत आहेत.

Share This Article
error: Content is protected !!