नायगाव नगरीचे सिंघम देविदास तमनबोईनवाड यांची शिवसेनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड…!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे 

नायगाव हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ) यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे अनुजमातीचे नांदेड जिल्हा प्रमुख भालचंद्र मोळके यांच्या अध्यक्षतेखाली नायगाव येथील विश्रामगृहात घेण्यात आलेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत शिवसेना प्रणित अनुसूचित जमाती विभागाच्या नायगाव तालुका अध्यक्षपदी देविदास चंदर तमन्नबोईनवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

         सदर नियुक्तीचा कालावधी हा एक वर्षाचा राहणार असून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा आपण सक्रीयपणे विचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे असे नियुक्ती पत्रात नमूद केले आहे.या निवडी बद्दल सूर्यकांत कोलकमवाड ,अंबादास गाडगे,तुकाराम बोईनवाड ,

कमलाकर पोलकमवाड, साईनाथ मुद्देवाड,राजकुमार गादगे.व मित्र परिवार आदींनी शुभेच्छा दिल्या आहे…

Share This Article
error: Content is protected !!