प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब यांची प्रमुख उपस्थिती..
हिमायतनगर शहर प्रतिनिधी/लक्ष्मण भैरेवाड
नांदेड – हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तालुक्या सह जिल्ह्याला परिचित असणारे व मागील अनेक वर्षापासून आष्टीकर घराण्याशी एकनिष्ठ असलेले, शिवसैनिक ओबीसी नेते संजय काईतवाड यांची हिमायतनगर तालुका प्रमुख पदी निवड जाहीर करण्यात आले.
गेल्या 22 वर्षांपासून संजय काईतवाड एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून पक्षाचे काम केले त्यांच्या कार्याची दखल घेऊन व तसेच ओबीसी नेते म्हणून हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हिमायतनगर शिवसेना तालुकाप्रमुख निवड करण्यात आली आहे, संजय काईतवाड यांच्या निवडी बद्दल हिमायतनगर तालुक्यासह जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती गोल्ला गोलेवार यादव समाजाचे प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब,युवा सेना मराठवाडा सचिव श्री कृष्णा पाटील आष्टीकर,गो. गो. यादव जेष्ठ समाजसेवक बालाजीराव शैनेवाड, नारायणजी वटपलवाड, योगेश पाटील सोनारीकर, अरविंद पाटील, गजानन देवसरकर, संतोष पुलेवार, प्रदेश युवक अध्यक्ष अभिषेक बकेवाड, यांनी उपस्थित होते.
खा.आष्टीकर यांनी संजय काईतवाड यांना संधी देऊन गोल्ला गोलेवार यादव समाजाचा सन्मान केला – प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड
हिंगोली लोकसभेचे खासदार माननीय श्री नागेशजी पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शाना खाली संजयजी काईतवाड यांच्या आजपर्यंत पक्ष वाढविण्यासाठी 84 हादगांव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक कामे केलं, संजय काईतवाड यांना खा.आष्टीकर साहेबानी तालुका प्रमुख पदांची संधी देऊन गोल्ला गोलेवार यादव समाजाचा सन्मान केला , येणारा काळांत संजयजी काईतवाड यांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभे राहणार आहे असे प्रतिपादन प्रदेश अध्यक्ष आक्केमवाड यांनी केले.