तालुका प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नायगाव:शहरात भव्य शिवगर्जना पायी दिंडी घेऊन शिवभक्तांनी मोठा आनंद उत्सव केला आहे. या दिंडीत हर हर महादेव च्या जय घोषणे शिवगर्जना पायी दिंडीचे नायगाव शहरात आगमन होताच भाजपा कार्यकर्ते श्री गजानन पाटील चव्हाण यांनी शिवभक्ताची सेवा करण्यासाठी व त्यांना अल्प उपोहार देऊन त्यांच्या दिंडीत सामील झाले आहे. सदर दिंडीत मलिन होऊन भक्तिमय वातावरण असल्याने माझ्या जीवनात असे धार्मिक प्रसंग मिळो व अशा भक्ताची वारंवार सेवा करण्यासाठी संधी लाभो हीच भगवान महादेव चरणी प्रार्थना देखील करण्यात आले आहेत आणि शिवगर्जना दिंडीचा आशीर्वाद घेतले सदर दिंडी ही दिनांक 28/0 8 /2023 रोजी प्रसिद्ध महादेव मंदिर देवस्थान गंगनबीड येथे पवित्र श्रावण महिन्यामध्ये सोमवार या दिवशी नांदेड जिल्हा ग्रामीण सह मराठवाड्यातील सर्व शिवभक्त मंडळी विविध उपासना तप करून पायामध्ये वाहन न लेवता पायी दिंडी शिव भजन करत भगवंताच्या नामस्मरणात भारावून गेले होते
हे दृश्य पाहता गजानन पाटील चव्हाण यांनी सर्व शिवभक्त मंडळी यांना आपल्या कार्यालयात बोलून त्यांची सेवा करण्याची सर्व शिवभक्तांना विनंती केली शिवभक्त यांना फराळ व चाहा पाणी सह करून गजानन पाटील चव्हाण यांच्या कार्यालय मध्ये शंकर भोले बम बम बोले अशा विविध शिवगर्जना करून भजनामध्ये मग्न झाले नायगाव शहरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले या ठिकाणी सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते