जीवनावश्यक वस्तू काळाबाजार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची पत्रकार संघाची मागणी”
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – राशनमालाची तस्करी करणा-या इसमांकडून पत्रकारास जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभुमिवर किनवट व माहूर तालुक्यातील रेशनमालाची तस्करी करणा-या रॅकेटवर कारवाई करून जीवनावश्यक वस्तू काळाबाजार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी अ.भा.म. पत्रकार संघाकडून लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे…
एकीकडे शासन गोरगरीबांसाठी मोफत राशन देत असताना जुन,जुलै व ऑगस्ट या तीन महिण्यांचे रेशन लाभार्थ्यांना चालू महिण्यात वाटप होत आहे. याच संधीचा फायदा घेत काल दि. २२ रोजी बाई बाजार येथे राशन दुकानाच्या बाजूला उभे राहून एक इसम गरीब लाभार्थ्यांकडून गहु व तांदळ खरेदी करीत असल्याचे वास्तव येथील पत्रकार बाबाराव कंधारे यांच्या लक्षात आले.
त्यावेळी राशनमाल तस्करीसाठी खरेदी करीत असलेल्या इसमासह त्या वाहनाचे छायाचित्र घेतल्या नंतर तस्कराने कंधारे यांना हातपाय तोडुन जिवे मारण्याची धमकी दिली होती.या प्रकरणी सिंदखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अवैध व्यवसाय धारकांकडून पत्रकारांची मुस्कटदाबी कदापीही सहन केली जाणार नाही.अशी ठाम भुमिका घेवून तालुक्यातील पत्रकार संघाने आक्रमक पवित्रा घेत संबंधित प्रकराला पुर्णपणे चाप बसावा यासाठी चंग बांधला आहे..
दरम्यान आज दि.२३ जून रोजी तहसीलदार माहूर यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकारी नांदेड, सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट,तसेच तहसीलदार माहूर यांना लेखी निवेदन देवून रेशनचा काळाबाजार करणारे संपुर्ण रॅकेट उजेडात आणण्यासाठी तहसील प्रशासनाने खास पथकाची नेमणूक करावी व या संपुर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून जीवनावश्यक वस्तू (काळाबाजार प्रतिबंधक) अधिनियम,१९५५ नुसार गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे..
दिलेल्या निवेदनावर अखिल भारतीय मराठी पत्रकार परीषद शाखा माहुर चे तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी यांच्यासह राजकुमार पडलवार (सचिव), इलियास बावानी,संंजय सोनटक्के,प्रा.प्रविण बिरादार, कैलाश बेहेरे,अरुण पवार, राजकिरण देशमुख,राज ठाकुर,गजानन भारती,साजीद खान,जयकुमार अडकिने,अमजद खान लालखान,जावेद शेख यांच्यासह अनेक पत्रकार बांधवांच्या स्वाक्ष-या आहेत….