नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नायगाव – तालुक्यातील कुंटूर येथील पत्रकार अनिल कांबळे यांची उत्कृष्ट कामगिरी ,स्वत:चे आयुष्य जगताना सामाजिक भान बाळगत इतरांच्या आयुष्यातही जीवनरंग भरताना अनेकांचे प्राण वाचवण्याचे व्रत पाळत पत्रकर अनिल कांबळे यांनी आतापर्यंत 18 वेळा रक्तदान केले आहे. पत्रकार हे समाजसेवा आहे त्या समाजसेवेतून अनेक गरीब लोकांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम पत्रकार त्या माध्यमातून आजपर्यंत करत राहिले. त्यातही समाजसेवेचा वसा घेतलेले व समाजसेवेची आवड असलेले अनिल कांबळे यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान समजून गेल्या सात वर्षापासून दर तीन महिन्याला रक्तदान करत असून आज 18 वेळा रक्तदान करून आपलं कार्य चालू ठेवले.
अत्यावश्यक परिस्थितीसोबतच प्रत्येक. वाढदिवसालाही रक्तदान करत या श्रेष्ठदानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच त्यांनी प्रयत्न केला आहे. रक्तपेढीत त्यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो बालवीर जयंती, ब्लड बँकेमध्ये जाऊन, गुरुगोविंद सिंग जी ब्लड बँक ,जिजाऊ ब्लड बँक ,गोळवळर ब्लड बँक , जीवन आधार ब्लड बँक, अशा अनेक ब्लड बँकेमध्ये स्वतः जाऊन रक्तदान करत असतात त्यातही वाढदिवसाच्या दिवशी स्वतः व अनेक महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा रक्तदान करत या अविरत रक्तदानाच्या यज्ञात कोणतीही अपेक्षा न ठेवता रुग्णसेवेच्या हेतूने ते आवर्जून व ऐच्छिकपणे रक्तदान करतात. 7 वर्षांपासूनच्या त्यांच्या या संकल्पामुळे कित्येकांचे प्राण वाचले आहेत. ‘माझ्या रक्तदानामुळे कोणाचे प्राण वाचणार असतील, रक्ताची गरज असणाऱ्यांना रक्त मिळणार असेल तर मी कितीही वेळा, कोठेही रक्तदान करण्यास कटिबद्ध आहे’, असे ते म्हणाले. तीन महिन्यांतून एकदा असे 7 वर्षे पासुन रक्तदान केले. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून त्यांनी हे व्रत पाळले आहे. अपघातांचे वाढते प्रमाण आणि शुद्ध रक्त पुरवठ्याचा तुटवडा, अशी परिस्थितीत असल्याने पत्रकार अनिल कांबळे कुंटूरकर यांनी त्यांच्या कार्यातून समाजासमोर आदर्श घातला आहे.
…तर शेवटच्या श्वासापर्यंत रक्तदान करणार
समाज ऋणातून उतराई होण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. माझ्या रक्तदानामुळे इतरांच्या जीवनात आनंद फुलणार असल्यास मी आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत रक्तदान करणार. असे अनिल कांबळे कुंटूरकर यांनी सांगितले.