नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नांदेड जिल्ह्यातील कष्टकरी कामगार जनतेचे ज्वलंत प्रश्नावर वेळोवेळी मोर्चे आंदोलने करून जनतेचा लढा उभारणारे व कष्टकरी कामगार यांना न्याय मिळवून देणारे नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील एका सामान्य शेतमजूर कुटुंबातील कॉम्रेड देवराव नारे यांची नाशिक येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 25 व्या राज्य अधिवेशनामध्ये राज्य सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली हे नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची घेतलेलीदृष्ट्या दखल असून कॉम्रेड देवराव नारे विद्यार्थी दशे पासून सामाजिक चळवळीमध्ये व पुरोगामी डाव्या चळवळीमध्ये अग्रेसर राहून वेळोवेळी सरकारच्या विरुद्ध धोरणावर विरोधी आवाज उठवला अनेक वेळा जेल व अटक झाली नांदेड जिल्ह्यामध्ये रोजगार हमी वाचवा देश वाचवा मजूर वाचवा व तसेच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा निराधार महिलांच्या आंदोलन असेल व शेतकऱ्यांच्या कर्जमाफी असे पीक विमा असेल विद्यार्थ्यांना मोफत पास मिळण्यासाठी समन्यायी पाणी वाटपासाठी बिडी कामगारांच्या न्यायासाठी सफाई कामगारांच्या ग्राम रोजगार सेवकांच्या न्यायासाठी अनेकदा त्यांची संघटना बांधून न्याय मिळवून देण्याचे काम काँ. देवराव नारे यांनी केलेले आहे तरुण कार्यकर्त्यांच्या व संघर्षशील पणाचा हा सन्मान असून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या आंदोलनाची व चळवळीची सामान्याच्या प्रश्नाबद्दल असलेली भावना व तळमळ पाहून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्य कार्यकारणी मध्ये सदस्य म्हणून एकमताने निवड करण्यात आली ही नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.