नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीव कुमार गायकवाड
नांदेड – जिल्यातील धर्माबाद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रोकडे यांची अल्पवधितच बदली होऊन त्यांच्या जागी धर्माबाद शहरात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक पदी सदाशिव भडीकर रुजू झाले असून धर्माबाद पोलीस ठाणे अंतर्गत हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यासह ठीक ठिकाणी अवैध वाळू व मुरूम तस्करी चोरट्या मार्गाने अवैध वाहतूक रोखण्याचे मोठे आव्हान धर्माबाद पोलीस स्टेशन ला रुजू झालेले भाडिकार यांच्या पुढे उभे आहे.
धर्माबाद पोलीस स्टेशन चे तत्कालीन पोलीस निरीक्षक रोकडे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी सदाशिव भडीकर यांनी धर्माबाद पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला असल्याने धर्माबाद ठाणे अंतर्गत मोठ्या प्रमाणात वाळू मफियानी मांडलेला हौदस रोखण्याचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.तसेच मोबाईल वर मटका,ऑनलाईन बिंगो, पत्याचे क्लब,गुटखा,अवैध दारू विक्री,आदी अवैध धंदे देखील फोफावले आहेत.त्याचबरोबर दारू पिऊन येणाऱ्या महिलांना छेडछाड करणे धिंगाणा घालने व सतत होत असलेले दुचाकी चोरीला जाण्याचा घटना सातत्याने घडत असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे.त्यामुळे कायदा सुव्यवस्थेबरोबरच अवैध धंदे रोखण्याचे आव्हान नवीन पोलीस निरीक्षक सादशिव भडीकर यांचा समोर असणार आहे.
धर्माबाद शहरात सातत्याने होत असलेले दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत चालले असून तत्कालीन पोलीस निरीक्षक बहुतेक अपयशी ठरले असावे काही दिवसापूर्वी रेती माफियांचा धर्माबाद शहरात रेती व वाळू माफियानी उच्छाद मांडला होता.आता नूतन पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकार यांच्या समोर वाळू वाहतूक,मुरूम तस्करी,मोबाईल वर मटका ऑनलाईन लॉटरी,बावन पत्त्यांचा जुगार,गुटखा,व अवैध दारू विक्री धर्माबाद पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या शहरात व ग्रामीण भागात सुरू असून यावर नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सदशिव भडीकार यांच्या पुढे असून आता तरिह अवैध धंदे व गुन्हेगारी वर आळा बसेल का.? असा प्रश्न नागरिकात बोलले जात आहे.