नायगाव प्रतिनिधी/ अशोक वाघमारे
नायगाव – कुंटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील 31 गावातील रुग्णांसाठी वरदान ठरत असतानाच येथे पिण्याच्या पाण्याअभावी रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.पावसाळ्यातील होणाऱ्या
आजारांचा पादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा आटापिटा करत असताना त्यांनाच मुलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डझनभर समस्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसल्या आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यास, रुग्णांना बाहेरून पाणी आणावे लागते, ज्यामुळे गैरसोय होते पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यास, रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळणे कठीण होते. रुग्णांना निरोगी राहण्यासाठी शुध्द पाण्याचा सल्ला देणारे आरोग्य केंद्रच पाणी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णांसाठी महत्त्वाचे असून मेडिकलला रेफर करण्यापूर्वी त्यांच्यावर प्राथमिक उपचार येथेच होतो. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र नानाविध समस्यांनी ग्रासलेले आहे. आरोग्य केंद्रात रुग्णांना शुध्द पाणी मिळावे ह्याकरिता आरओ मशीन लावणे गरजेचे आहे.अशे सामाजिक कार्यकर्ते अफरोज सादिक चौधरी यांनी ग्रामसभेमद्ये ग्रामसेवक यांना आराखड्यात घेण्यास सांगितले व संदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांना रीतसर पत्र देण्यास विनंती केली व ते पत्र देण्यात ही आले असूनही आजपर्यंत अद्यापही ग्रामसेवकांनी या कडे लक्ष दिले नसून रुग्णांना आपल्या हक्काच्या शुद्ध पाण्यापासून जाणून बुजून वंचित ठेवले जात आहे. व तसेच संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचारी हे पाणी विकत घेत आहेत असे अफरोज चौधरी यांनी सांगितले..
खेडेपाड्यातील तिस गावातील लोक कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात येथे आल्यानंतर विविध प्रकारच्या अडचणींना रुग्णांसह नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. प्रामुख्याने कुंटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची अडचण प्रचंड जाणवत आहे. अशा परिस्थितीत बाहेरून पाणी आणण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. अशात होणाऱ्या गैरसोयीकडे आरोग्य विभाग व विशेषतः ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देण्याची गरज आहे.
कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक साहित्य खरेदी जसे की, आरओ मशीन, वॉटर सोलर हिटर इतर मागणीकरिता पत्र व्यवहार ही केला गेला असून कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कुंटूर ग्रामपंचायत यांच्याकडे आरोग्य केंद्रात आरओ मशीन तथा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाठपुरावा करतोय असे अफरोज चौधरी यांनी सांगितले.जानेवरी 2025 मध्ये पत्र व्यवहार करण्यात आला. पत्रव्यवहार करून ही आवश्यक आरओ मशीनच्या प्रतीक्षेतच आहे
कुंटूर ग्रामपंचायत दर वर्षी जो गाव विकास आराखडा तयार करतो त्यात 25% निधी आरोग्य व शिक्षणासाठी खर्च करावा लागतो. त्या प्रमाणे 1 ते दीड लाख रुपये आरोग्य क्षेत्रासाठी खर्च करणे आवश्यक असते. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्राकडून साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पत्र देण्यात आली. त्या पत्रामध्ये RO filler मशीन, वॉटर सोलर हिटर अशा अनेक साहित्य मिळाव्यात अशी मागणी केली .तरी ही कुंटूर ग्रामपंचायत हे सदरील साहित्य खरेदी करून देत नाही. असे सामाजिक कार्यकर्ते अफरोज सादिक चौधरी यांनी सांगितले.
येत्या काही दिवसात ग्रामपंचायत प्रशासनाने RO फिल्टर मशीन व वॉटर सोलार हीटर हे दोन्ही साहित्य खरेदी करून प्राथमिक आरोग्य केंद्रात सुपूर्त करावे जेणेकरून रुग्णांची सोय व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अफरोज चौधरी यांच्याकडून केली जात आहे.