अन्न औषध विभागाच्या आशीर्वादाने जिल्यात गुटखा माफियां कडून अवैध गुटखा विक्री जोमात…

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

 नांदेड – जिल्यातील सोळा तालुक्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित असलेल्या गुटखा मोठ्या प्रमाणात तालुक्या तालुक्यात सर्वच शहरात बाजारात गुटख्याचा पुरवठा केला जात आहे. 

वाई बाजार व लगतच्या खेड्यापाड्यातील गुटखा दुचाकी व चार चाकी कारद्वारे तस्करी करणाऱ्यांनी मोठे गोदाम तयार केले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.या वाई बाजारात पुरवठा इतर जिल्ह्यातून व बाहेर राज्यातून येणारी वाहने दिवसाढव्य व रात्रच्या सुमारास गाड्या भरून रिकामी करण्यात येत आहे. त्यानंतर छोट्या वाहनांमध्ये भरून त्या मालाची विल्हेवाट लावण्यात येते त्यासाठी वाई बाजारातील अन्न औषध विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या छोट्या-मोठ्या गाव खेड्यातील या गुटका माफीयांचा जोरात धंदा सुरू आहे.

 महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी झाली असतानाही वाई बाजारातून गुटखा माफिया खेड्यापाड्यातील दुचाकी कारद्वारे व चार चाकीने गुटख्याची खुलेआम विक्री करण्यात येत आह. वाई बाजार येथील गुटखामाफी यांच्या इशाऱ्यावर गुटखा तस्करीचा हा संपूर्ण खेळ चालवण्यात येत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या संदर्भात संबंधित सर्व वाघांना माहिती असतानाही कारवाई करण्यासाठी कुणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही. 

महाराष्ट्र राज्यात एकीकडे अनेक सामाजिक संस्था, शाळकरी मुलांकडून जनजागृती रॅली काढण्यात येते मात्र दुसरीकडे गुटख्यासह सुगंधी तंबाखूची सरासरी विक्री सुरू आहे.परिणामी लहान मुलांनाही तंबाखूचे व्यसन लागले आहे त्यामुळे प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

      शासनाकडून सुगंधित तंबाखू व गुटखा प्रतिबंधन लावण्यात आले असले तरी वाई बाजारात गुटखा बंदी कायदा कुचकामी ठरत आहे.अठरा वर्षाखालील मुलांना तंबाखू गुटखा विकत घेणे कायद्याने गुन्हा आहे परंतु अशा मुलांना गुटखा खरेदी करताना पहात आहे. 

     माफियांनी गुटखा सुगंधित तंबाखू विक्री करून मुलांना आजाराच्या गर्दीत ढकलत आहेत.विशेष म्हणजे अनेक महिला व तरुण गुटख्याच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे.प्रशासनाकडून कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

Share This Article
error: Content is protected !!